Shirgao: जत्रोत्‍सवात दुर्घटना घडली, खाणींमुळे भविष्य अंधारमय! शिरगावातील ऱ्हास हे मोठे नुकसान; गोवा फाउंडेशन

Goa Foundation: शिरगावातील आध्यात्मिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक ऱ्हास हे मोठे नुकसान आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर खूप उशीर होऊ शकतो, असा इशाराही गोवा फाऊंडेशनने दिला आहे.
Illegal Stone Mining
Illegal Stone MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिरगावच्‍या जत्रोत्‍सवातील दुर्घटनेबद्दल गोवा फाऊंडेशनने दुःख व्यक्त केले आहे. आजचे राजकारणी केवळ सध्याच्या पिढीच्या जीवनाचा दर्जाच नष्ट करत नाहीत तर भावी पिढ्यांचे भवितव्यही अंधकारमय बनवत आहेत, अशा प्रखर शब्दांत त्‍यांनी सरकारवर टीका केली आहे.

शिरगावातील आध्यात्मिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक ऱ्हास हे मोठे नुकसान आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर खूप उशीर होऊ शकतो, असा इशाराही गोवा फाऊंडेशनने दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्‍या कुटुंबीयांचे त्‍यांच्‍या घरी जाऊन तसेच जखमींचे इस्पितळांत जाऊन सांत्वन केले असले तरी खाण व्यवसायामुळे शिरगावच्‍या होणाऱ्या विध्वंसावरही त्‍यांनी चिंतन करावे. हजारो भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन

दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी गरजेची आहे. घटनेवेळी तेथे संबंधित जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते, असे फाऊंडेशनने म्‍हटले आहे.

पाण्याच्या कलशाचे प्रतीक असलेली श्री लईराई देवी एकेकाळी भरपूर नैसर्गिक झरे असलेल्या शिरगावला आली. त्‍यामुळे हे गाव गोव्याच्या कृषीसंपत्तीचा एक महत्त्वाचा भाग बनले होते.

Illegal Stone Mining
Goa Stampede: '..अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा ऐकू येत आहे'! लईराई दुर्घटनेतील प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

परंतु अनेक दशके या भागात सुरू असलेल्या खाणव्‍यवसायामुळे सर्व काही उद्‌ध्‍वस्‍त झाले. गावातील दोन तृतीयांश जमीन आणि सर्व नैसर्गिक झरे नष्‍ट झाले. स्‍थानिक लोक आता आपल्‍या सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. कारण त्‍यांना आपला गाव आणि आपली संस्‍कृती टिकवून ठेवायची आहे, असेही गोवा फाऊंडेशनने म्हटले आहे.

Illegal Stone Mining
Goa Mining: 88 हजार कोटींची निर्यात, पण गोव्याच्या पदरी फक्त 3000 कोटी! पोर्तुगीज काळापासून असलेले 'खाणपट्टे'

खाण कंपन्‍यांना कुरवाळणे पडले महागात

शिरगावात खाणव्यवसायामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात २०२२ मध्ये तेथील जागा पुनर्संचयित करण्याचे काम सुरू करण्याऐवजी सरकारने वेदान्‍ता लिमिटेड, राजाराम बांदेकर आणि साळगावकर शिपिंग या खाण कंपन्यांना मंदिर आणि वस्ती ज्या जमिनीवर आहे, तेथे खनिज काढण्याचे अधिकार दिले. या खाणपट्ट्यांच्या हद्दीबाबत माहिती नसल्याचे सांगून नंतर विधानसभेत नजरचुकीने झाल्याचे मान्य केले. असे असूनही मार्च २०२४ मध्ये निवडणूक आचारसंहितेदरम्यान मंदिर व वस्तीच्या आवारातील खाणकामाचे अधिकार वेदान्‍ता लिमिटेडला देण्याच्या भाडेपट्टीचा करार केला. सरकारची ही कृती जाणूनबुजून विध्वंसक करणारी असल्याचा आरोप गोवा फाऊंडेशनने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com