Shri Damodar Sansthan Samiti, Zambaulim, Vasco - Goa. Pradip Naik / Dainik Gomantak
गोवा

‘जांबावली’च्या मतदानास राज्याबाहेरील महाजनही पात्र

सात दिवसांत मतमोजणीचे गोवा खंडपीठाचे आदेश

दैनिक गोमन्तक

मडगाव : जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थान निवडणुकीत गोवा राज्याबाहेरील महाजन देखील मतदानास पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी ( 29 जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. शिवाय या निवडणुकीत झालेल्या मतांची मोजणी सात दिवसांत करा असा आदेशही कोर्टाने मामलेदारांना दिला.

पूर्वी आक्षेप याचिकेवर खंडपीठाने अंतरिम आदेश देताना राज्यातील आणि राज्याबाहेरील सर्व महाजनांना वेगवेगळे मतदान करण्याचा आदेश देत अंतिम आदेश येइपर्यंत ही मते वेगवेगळी ठेवण्यात यावीत असे सांगितले होते. न्यायालयाने राज्याबाहेरील महाजनांनाही मतदानाचा हक्क आहे हे स्पष्ट करीत सात दिवसांत आधी केलेल्या मतदानाची मतमोजणी करावी असा आदेश मामलेदारांना देताना निकाल लागल्यावर पाच दिवसांत नव्याने निवडून आलेल्या समितीकडे ताबा द्यावा, असे सांगितले.

गोव्यात स्थायिक नसलेल्या महाजन यांना महाजनी कायद्यानुसार मतदानाचा अधिकार नाही असा आक्षेप रौनक कामत बांबोळकर व निषाद हेगडे देसाई या दोन महाजनांनी घेतला होता. त्यानंतर जांबावली देवस्थान समितीने राज्याबाहेरील 2354 महाजनांचा मतदानाचा हक्क काढून घेतला.

या निर्णयाला रामनाथ शानभाग आणि इतर 14 राज्याबाहेरील महाजनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेली 30 वर्षे आपण मतदान करत आलो आहोत हा त्यांचा दावा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT