Damodar Saptah Vasco Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah Vasco: 'जय जय राम कृष्ण हरी'; दामोदर भजनी सप्ताह उत्साहात सुरू

Shri Damodar Bhajani Saptah: अखंड २४ तास साखळी पद्धतीने भजनी पथकांच्या भजनाला सुरुवात झाली

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: श्री दामोदर भजनी सप्ताहाला शनिवार १० रोजी दुपारी १२.३० वाजता सुरुवात झाली. जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर हरी जय जय राम कृष्ण हरी नामाच्या गजरात २४ तासांचा अखंड भजनी सप्ताह सुरू झाला.

अशोक मांद्रेकर यांच्या गायनाने प्रारंभ झाला. पारसमितीतर्फे श्रीचरणी श्रीफळ अर्पण केले. अखंड २४ तास साखळी पद्धतीने भजनी पथकांच्या भजनाला सुरुवात झाली. संध्याकाळच्या सत्रात विविध पार समितीतर्फे पारांचे व गायन मैफलींचे आयोजन करण्यात आले होते.

संध्याकाळी ६ वाजल्यापासून दिंडीच्या गजरात पार मिरवणुका मंदिराकडे निघाल्या. प्रत्येक पार समितीतर्फे आयोजित गायन मैफली रंगल्या. नटराज थिएटर, वास्को टुरिस्ट टॅक्सी स्टॅण्ड, मुरगाव पालिके समोर गायन मैफली पार पडल्या.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, मिलिंद नाईक, बाबू कवळेकर, उद्योगपती नारायण बांदेकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नंदादीप राऊत, दीपक नाईक, श्रध्दा आमोणकर, शमी साळकर, उपजिल्हाधिकारी भगवान करमली, उपअधीक्षक सलिम शेख, पोलिस निरीक्षक कपिल नायक, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, तसेच इतर मान्यवरांनी दामोदर देवाचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT