Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: श्रीपादभाऊंना सत्तरीतून सर्वाधिक मतदान

Goa Politics: मंत्री विश्‍वजीत राणे यांना विश्वास: चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

मतपेटीच्या माध्यमातून लोकांच्या मनात काय आहे ते निवडणुकीत व्यक्त होणार आहे. मी आणखी त्यावर काय बोलणार. उत्तर गोव्यातील भाजप उमेदवार श्रीपाद नाईक हे यावेळी बहुमताने निवडून येतील.

सत्तरीतून त्यांना सर्वाधिक मतांची आघाडी देण्याचा प्रयत्न आहे व इतिहास घडविला जाईल, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पणजी येथील रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलताना मत व्यक्त केले.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गेली अनेक वर्षे भाजपचे खासदार आहेत. ते बहुमताने प्रत्येकवेळी निवडून आले आहेत. राज्यात त्यांच्याप्रमाणे निवडून आलेला नाही. त्यांनी केलेली कामे व खासदारकीच्या माध्यमातून केलेले आर्थिक साहाय्य यामुळे त्यांना सत्तरीतून पूर्ण पाठिंबा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा त्यांच्या माध्यमातून राज्यात पोहचण्यास मदत होते व त्यांचे मार्गदर्शन लाभते. यावेळी ते उत्तर गोव्यातून मतांचा इतिहास घडविणार हे नक्की आहे. त्याचा फायदा राज्याला होणार आहे, असे राणे म्हणाले.

सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आरोग्य खात्याला ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग ४ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या त्याचे लोकार्पण आज आल्तिनो - पणजी येथील वन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

आणखी रुग्णवाहिका!

गोव्यात रुग्णवाहिका कमी पडत आहेत. महामार्गावरील रस्ता अपघातांसाठी आणखी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा विचार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती मिळवून आराखडा तयार केलेला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांच्याकडे सीएसआरच्या माध्यमातून आणखी काही रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे सरकार लोकांचे जीवन वाचवण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करायला हव्यात, त्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT