Goa Valpoi Murder Dainik Gomantak
गोवा

Shravan Barve Murder: 'श्रवण'चा मृतदेह सापडला, भाऊ गोळा करीत होता काजू बोंडू; अरेरावी आली अंगलट

Valpoi Sattari Murder Case: पोलिस चौकशीत आणखीन काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. हा खून नेमका कोणी केला, केव्हा व कसा केला, कोण मुख्य आरोपी व कोण साथीदार होते.

Sameer Panditrao

वाळपई: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आंबेडे, सत्तरी येथील श्रवण बर्वे (२४) या युवकाचा १४ रोजी रात्री खून झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करीत त्याचे वडील देविदास व बंधू उदय बर्वे या दोघांना शनिवारी रात्री अटक केली होती. रविवारी त्यांना न्यायाधीशांसमोर उभे केल्यानंतर त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा वाळपई प्राथमिक न्यायालयात त्यांना उभे केले असता ९ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस चौकशीत आणखीन काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. हा खून नेमका कोणी केला, केव्हा व कसा केला, कोण मुख्य आरोपी व कोण साथीदार होते यासह अन्य काही प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत. श्रवण बर्वे याचा खून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून सिद्ध झाले आहे. परंतु अजून अनेक गोष्टी समोर येणे बाकी आहेत.

शुक्रवारी संशयित वासुदेव ओझरेकर (आंबेडे) याला अटक करून दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या तिघांच्या चौकशीतून अजून बऱ्याच गोष्ट समोर येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी श्रवण मरण अवस्थेत सापडला होता, त्या दिवशी नागरिक जमा झाल्यानंतर वडील देविदास व बंधू उदय बर्वे हे दोघेही संशयास्पद वागत होते. त्या दिवशी श्रवणचा मृतदेह लोकांसमोरच असताना बंधू उदय हा चक्क काजू बोंडू गोळा करीत होता, असा काही प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे. त्यामुळे हा सर्वच प्रकार थक्क करणारा होता.

वडिलांनी सुरवातीला मृतदेहाची शवचिकित्सा करण्यास मनाई केली होती, अशीही माहिती समोर येत आहे. त्यात देविदास बर्वे याचा स्वभाव खूपच तापट असल्याने त्याचे गावातही कोणाशीच पटत नव्हते, असेही सांगण्यात येते.

पोलिसांचे कौतुक

उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी पोलिस अधिकाऱ्यांचे खास पथक तयार करून वापळई पोलिसांच्या सहकार्याने चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत संशयितांना अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. हा खुनाचा प्रकार म्हणजे वडील व बंधू या नात्याला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्यामुळे या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT