Shravan Barve murder case Dainik Gomantak
गोवा

Sharavn Barve Murder: पाचवेळा मुलाविरुद्ध तक्रार, एकदा अटक! श्रवण बर्वेचा खून का झाला? पोलिसांनी दिली मोठी अपडेट

Shravan Barve Murder Update: उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत तपासाचे काही तपशील उघड केले.

Akshata Chhatre

सत्तरी: आंबेडे-नगरगाव येथील २४ वर्षीय श्रवण बर्वेच्या हत्याप्रकरणाचा गोवा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून श्रवण बर्वे याचा खून झाला असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी खुनाची तक्रार नोंदवत प्रकरणाचा तपास सुरु केला असता काही धागेदोरे हाती लागले आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रविवारी (दि.२०) रोजी पत्रकार परिषदेत तपासाचे काही तपशील उघड केले.

अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी वासुदेव ओझरेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मयत श्रवण बर्वे याच्या वडिलांनीच त्याच्या मदतीने १३ एप्रिल रोजी स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा कट रचला होता. यासोबतच समोर आलेल्या महत्वाच्या माहितीनुसार मयत श्रवण बर्वे याच्या विरोधात यापूर्वी वडील देविदास बर्वे यांनी पोलीस स्थानकात तब्बल पाचवेळा मारहाणीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या तसेच श्रवण याला अटक देखील करण्यात आली होती. सध्या या प्रकरणातील प्रमुख तीन संशयीत पोलिसांच्या ताब्यात असून याचा सखोल तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण आणि त्याच्या घरच्यांमधील संबंध चांगले नव्हते आणि म्हणूनच श्रवण गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या आई-वडिलांसोबत न राहता एकटाच आंबेडे येथील घरात एकटाच राहायचा. दिवसभरातून एकदाच त्याचे वडील त्याला भेटून जेवण द्यायचे.

श्रवण त्याच्या मर्जीने एकटा राहायचा की कुटुंबिक वादामुळे त्याला दूर करण्यात आलं याची अद्याप माहिती उघड झालेली नाही, मात्र गळा दाबल्याने श्रवणचा मृत्यू झाला आहे, मात्र मयताच्या शरीराजवळ आढळलेल्या दोरीनेच हा मृत्यू झाला आहे की नाही याची माहिती समोर आलेली नाही.

वाढदिवसाची पार्टी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रवण बर्वे खूनप्रकरणापूर्वी रात्री जवळच असलेल्या हनुमान मंदिरात एका स्थानिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, त्यानंतर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी देखील श्रवण तिथे उपस्थित होता. प्रमुख संशयित वासुदेव ओझरेकर या मंदिराच्या अध्यक्षपदी असल्याचं देखील तपासात उघड झालं आहे. वाळपई पोलिसांसह डिचोली आणि पर्वरी पोलीस देखील या प्रकरणाचा छडा लावत आहेत, तसेच या खून प्रकरणात पैसे देऊन खून केल्याची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

SCROLL FOR NEXT