Goa Murder Case: श्रवणचा खून कोणी केला? हेतू काय? कारण अजून अस्‍पष्‍टच; तपास युद्धपातळीवर

Shrawan Barve Murder Case: बुधवारी शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर श्रवणचा गळा आवळून मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. तसेच त्‍याच्‍या अंगावर विविध ठिकाणी जखमा होत्‍या.
Shrawan Barve Murder Case
Sattari Nagargao Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्‍यातील नगरगाव-आंबेडे येथे मंगळवारी (१५ एप्रिल) रोजी श्रवण देविदास बर्वे (२४) या युवकाच्‍या झालेल्‍या खूनप्रकरणी पोलिसांच्‍या हाती अजूनही ठोस धागेदोरे सापडलेले नाहीत. त्‍याचे खुनी मोकाटच आहेत. मात्र पोलिसांनी तपास युद्धपातळीवर सुरू ठेवला आहे.

तीन दिवस उलटले तरी श्रवणचे खुनी पोलिसांना गुंगारा देत आहेत. श्रवणचा मृतदेह मंगळवारी सकाळी प्रथम त्याच्‍या वडिलांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी आपले नातेवाईक तसेच पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. श्रवणच्या वडिलांनी खुनाचा संशय व्यक्त करत पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली.

दुसऱ्या दिवशी म्‍हणजे बुधवारी शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर श्रवणचा गळा आवळून मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. तसेच त्‍याच्‍या अंगावर विविध ठिकाणी जखमा होत्‍या. त्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची वेग वाढवला आहे.

शेजाऱ्यापाजाऱ्यांची तसेच श्रवणच्‍या मित्रांची कसून चौकशी करण्‍यात येत आहे. शिवाय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, वाड्यावरील लोक, कुटुंबीय, नातेवाईक यांचीही जबानी घेतली जात आहे. संशयास्पद वाटणाऱ्या व्‍यक्तींवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे.

दरम्‍यान, शांततापूर्ण नगरगाव-आंबेडे गावात घडलेल्‍या या खूनप्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे. एका युवकाचा खून करण्‍याचे कारण काय? हा एकच प्रश्‍‍न तेथील लोकांना सतावत आहे. गावात शांतता पसरली आहे.

Shrawan Barve Murder Case
Goa Murder Case: श्रवणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट; खूनाचा कट कुणी रचला?

पोलिस अधिकाऱ्यांची फौज घटनास्‍थळी

आज गुरुवारी सकाळपासून उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्‍‍वेश कर्पे, वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला व काहींची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा तपास सुरू होता. मिळालेल्‍या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती रात्री काही धागेदोरे सापडले असल्याने लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्‍यता आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, आमचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल.

Shrawan Barve Murder Case
Goa Murder Case: श्रवण बर्वेचा गळा दाबून खून! शवचिकित्सा अहवालातून धक्कादायक माहिती उघड

खुनाचे कारण अजून अस्‍पष्‍ट

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण हा चांगला व मनमिळाऊ मुलगा होता. तो सर्वांबरोबर चांगला वागायचा. त्याचा खून कोण करणार, अशा प्रकारची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्‍याचा खून करण्‍याचा नेमका हेतू काय?, खून नेमका कोणी केला? याबाबतचे कोडे अजून उलगडलेले नाही. मात्र ते लवकरच सुटेल, असा विश्‍‍वास पोलिसांनी व्‍यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com