सत्तरी: आंबेडे-नागरगाव येथील २४ वर्षीय श्रवण बर्वे यांच्या मृत्यू संदर्भात एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या स्थानिक इसमाचे नाव वासुदेव नकूळ ओझरेकर ४३ वर्षीय असून सध्या प्राथमीक स्थरावर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर गोवा पोलीस अधिक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या खुनाच्या प्रकरणी आणखीनही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
२४ वर्षीय श्रवण बर्वेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडेच खळबळ मातली होती. गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळे श्रवणचा मृत्यू झाला असल्याची माहिती शवचिकित्सेमधून उघड झाली आणि यानंतर बुधवार (दि.१६) रोजी पणजीत सांतईनेज परिसरात श्रवणच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबेडे-नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे याचा मृतदेह त्याच्या वडिलांना घरासमोर आढळला होता. त्याच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आढळली होती, त्यामुळे हा मृत्यू हाताने गळा दाबून झाला की नेमका प्रकार काय याची सविस्तर माहिती उघड होणं बाकी आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने उत्तर गोव्यातील पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी आत्ताच्या घडीला आणखीन माहिती देण्यास नकार दिलाय, मात्र आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
ठिकठिकाणी जखमा आणि मृतावस्थेत सापडलेल्या मुलाच्या मृत्यूची तक्रार वडील वासुदेव बर्वे यांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. मृत्यूच्या अगोदर क्रिकेट पाहायला गेलेल्या श्रवणच्या मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट आहे.
बारावीनंतर आयटीआयचा डीटीपी कोर्स केलेला श्रवण क्रॉम्प्टन कंपनीत कामाला होता, मात्र काही दिवसांपूर्वीच नोकरी सोडून तो शेतीबागायतीचा व्यवसाय सांभाळायचा, तसेच आंबेडे येथील घरात एकटाच राहात होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.