accused judicial custody Dainik Gomantak
गोवा

Shravan Barve Murder: श्रवण बर्वे खून प्रकरणी आरोपींना आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shravan Barve murder update: वाळपईतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी

Akshata Chhatre

सत्तरी: आंबेडे, नगरगाव येथील २४ वर्षीय श्रवण बर्वे हत्त्या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वाळपईतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.

२४ वर्षीय तरुणाचा मृतदेह घराजवळ सापडताच गोवा पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करायला सुरूवात केली होती. यानुसार सर्वात आधी आंबेडे येथील संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आली होती, वासुदेवनेच पोलीस चौकशी दरम्यान देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांची नावं उघड केल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रविवारी (दि.२०) रोजी पत्रकार परिषदेत तपासाचे काही तपशील उघड केले होते.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी वासुदेव ओझरेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मयत श्रवण बर्वे याच्या वडिलांनीच त्याच्या मदतीने १३ एप्रिल रोजी स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा कट रचला होता. श्रवण आणि त्याच्या घरच्यांमध्ये संबंध ठीक नसल्याने तो एकटाच वाळपई येथील घरात राहायचा.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रवण बर्वे खूनप्रकरणापूर्वी रात्री जवळच असलेल्या हनुमान मंदिरात एका स्थानिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, त्यानंतर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी देखील श्रवण तिथे उपस्थित होता.

प्रमुख संशयित वासुदेव ओझरेकर या मंदिराच्या अध्यक्षपदी असल्याचं देखील तपासात उघड झालं आहे. सध्या या प्रकरणी आणखीन काय माहिती समोर येते किंवा या हत्या प्रकरणाचं प्रमुख कारण काय याचे तपशील अद्याप समोर येणं बाकी आहे.

सर्वात आधी पोलिस घटनास्थळी तपासासाठी पोचले, त्यावेळी वडील देविदास आणि भाऊ उदय हे दोघे बिनधास्त होते. आपला मुलगा गेला, याचे त्यांना दु:ख नव्हते.

गावातील प्रत्येकजण घटनास्थळी येऊन श्रवण गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करायचा. मात्र, हे दोघे बिनधास्त होते. त्यामुळे त्याचदिवशी पोलिसांना त्यांच्यावर संशय पक्का झाला होता. मात्र पुरावा नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

Gajakesari Rajyoga 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायातून कोट्यवधींचा नफा कमावण्याची संधी! 'गजकेसरी राजयोग' ठरणार वरदान; 5 राशींची आर्थिक चिंता मिटणार

SCROLL FOR NEXT