Shramdham Yojana|Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Shramdham Yojana: प्रियोळमध्ये निराधार व गरजूंना सहा घरे; श्रमधाम योजनेतून लाभार्थ्यांना चाव्या वितरित

गोमन्तक डिजिटल टीम

सावईवेरे: श्रमधाम योजनेतून राज्यभरात एक हजार घरे बांधता येतील एवढा मोठा प्रतिसाद समाजातून मिळत आहे. राज्याच्या विविध भागात प्रत्येकी ५०० कार्यकर्ते उभे राहिले, तर दहा वर्षांत हे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे, असा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केला.

मंगेशी येथे काल झालेल्या श्री बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. फाउंडेशनने तवडकर यांच्या श्रमधाम या अनोख्या संकल्पनेतून प्रियोळ मतदारसंघात सामूहिक श्रमातून निराधार व गरजूंना सहा घरे बांधून दिली असून लाभार्थ्यांना चाव्या वितरित करण्यात आल्या. लाभार्थ्यांना चाव्या वितरणाचा सोहळा नुकताच मंगेशी येथील बेला सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला.

प्रियोळ मतदारसंघातील नामदेव गावडे (वेलिंग), रमाकांत गावडे (वेलिंग), सत्यवती परवार (केरी), शोभा गावडे, मिरा गावडे (खांडोळा) व शशिकला गावडे (भोम) यांनी पाहिलेल्या नव्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी प्रियोळचे माजी आमदार दीपक ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, धाकू मडकईकर, अंकुश गावकर, सविता तवडकर, विशाल देसाई, निशा च्यारी सेजल गावकर, रोहिदास केरकर, प्रकाश सतरकर, सुनील भोमकर, महेश शिलकर उपस्थित होते.

दीपक ढवळीकर म्हणाले, गरीब गरजूंना सामूहिक श्रमदान योजनेतून घरे बांधून देण्याचा हा सभापतींचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कारण यात कोणतेही राजकारण नसून समाजकारणाचे हे कार्य आहे. अशा उपक्रमांना माझा सदैव पाठिंबा व सहकार्य असेल. अनेक परिस्थितीवर मात करीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली आहे. त्यांच्या श्रमधाम सेनेला मी सलाम करतो. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात बेघर झालेल्यांनादेखील त्यांनी घरे बांधून देण्याचा संकल्प केला आहे. सर्वांनीच त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

यावेळी दामोदर नाईक, धाकू मडकईकर व सुनील भोमकर यांनीही सभापतींच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वप्रथम सविता तवडकर यांनी स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. याप्रसंगी प्रा. सोनी झोरे, प्रा. गोविंद भगत, विकास गावकर, प्रकाश सतरकर, नामदेव गावडे यांनी आपले अनुभव कथन केले. यानंतर श्रमधाम योद्धे तसेच पत्रकारांचा डॉ. तवडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय तवडकर यांनी केले. संतोष लोलयेकर यांनी आभार मानले.

‘व्यक्तीकडे केवळ मतदार म्हणूनच पाहू नका’

सभापती तवडकर पुढे म्हणाले, की श्रमधाम ही आपल्या पूर्वजांची जुनीच संकल्पना आहे. पूर्वी पैशांना किंमत नव्हती, माणसाला किंमत होती. परंतु आजच्या आधुनिक काळात आपण अशा काही चांगल्या प्रथा व परंपरा विसरत चाललो आहोत. आज गावपण, माणुसकी हरवत चालली आहे. ती पुनर्जिवीत करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. गोव्यात अजूनही दोन टक्के लोकांना राहण्यासाठी निवारा नाही, ही वस्तुस्थिती आहे. समाजातील शेवटचा माणूस वंचित, अविकसित, हताश राहू नये म्हणून माझ्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर निराधार लोकांना घरे बांधून दिली आहेत. आज व्यक्तीकडे नागरिक म्हणून न पाहता केवळ मतदार म्हणून पाहण्याची जी वृत्ती काही राजकारण्यांमध्ये निर्माण झाली आहे, त्याला पूर्ण छेद देणारा हा उपक्रम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT