Goa Shramdham Scheme: जनसहभागातूनच त्या वीस जणांचे स्वप्न पूर्ण- बिर्ला

काणकोणात श्रमधाम योजनेतून 20 जणांना घरे प्रदान
Goa Shramdham Scheme
Goa Shramdham SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shramdham Scheme: जनसहभागातून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून 20 घरे उभारून सभापती रमेश तवडकर यांनी देशापुढे ठेवले आहे.

सामूहिक शक्ती हीच भारताची ताकद आहे. तिचाच परिणाम श्रमधाम योजनेत दिसू येतो, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

श्रमधाम योजनेअंतर्गत उभारलेल्या २० घरांच्या चाव्यांचे घरमालकांकडे हस्तांतरण केल्यानंतर ते बोलत होते. काणकोण शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दाजी साळकर, गणेश गावकर, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, मोहन आमशेकर, भाजपचे संघटनमंत्री, व्ही. सतीश, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, एनआरआय कमिशनर ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, सर्वानंद भगत, सरपंच आनंदु देसाई, सरपंच सेजल गावकर, प्रतिजा बांदेकर उपस्थित होते.

बेघरांना घराची चावी दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. जीवनभर ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते, त्यांचे स्वप्न जनसहभागातून सभापती तवडकर यांनी साकारले.

देशभरात असे करोडो रहिवासी बेघर आहेत. पंतप्रधान आवास योजनेतूनही पक्की घरे दिली आहेत. श्रमधाम ही योजना प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अंमलात आणल्यास देशातील प्रत्येकाच्या किमान गरजा पूर्ण होतील, असे बिर्ला म्हणाले.

Goa Shramdham Scheme
Pernem News: कायदेशीर मान्यता न घेताच 'या' भागात सुरू आहेत दोन कोटींची कामे

यावेळी श्रीपाद नाईक, सदानंद शेट तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विशाल देसाई यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले. दिवाकर पागी यांनी आभार मानले.

प्रतिस्पर्ध्यांचे हस्तांदोलन

साखळीत विधानसभा असो वा नगरपालिकेची निवडणूक, एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कॉंग्रेसचे धर्मेंद्र सगलानी यांनी आज काणकोणात एकमेकांशी हस्तांदोलन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

सगलानी हे प्रायव्हेट शॅक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी असोसिएशनने श्रमधाम योजनेसाठी ११ लाखांची मदत दिली आहे. आज पुन्हा या योजनेसाठी सगलानी यांनी धनादेश सुपूर्द केला.

यावेळी सगलानी यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, व्यासपीठावरून खाली आल्यानंतर ‘दिलजमाई का’ असे विचारले असता ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com