Construction In Goa Dainik Gomantak
गोवा

Construction In Goa: हणजूणमध्ये 58 बांधकामांवर ‘संक्रांत’!

275 नोटिसांपैकी 71 निकाली; जीटीडीसीच्‍या जागेत 13 बेकायदा बांधकामे

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Construction In Goa: हणजूण पंचायत क्षेत्रातील सीआरझेड भागामधील 275 बेकायदा बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी 71 बांधकामांच्या दस्तावेजांची छाननी केल्यानंतर 45 बांधकामे बेकायदा आढळून आली तर 26 अधिकृत आहेत. उर्वरित 204 बांधकामांची तपासणी केली जाईल. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्‍या जागेवर सुमारे बेकायदा 13 बांधकामे आहेत.

ती पाडण्याचा आदेश जारी झाल्यापासून दहा दिवसांच्या आत ती पाडली जातील, अशी माहिती हणजूण पंचायतीने मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाला दिली. पुढील कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी स्वेच्छा याचिकेवरील सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.

हणजूण समुद्रकिनारी रेतीच्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे उघडकीस येऊन ते पाडण्याचा आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीला सीआरझेड परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून बेकायदा बांधकांमाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश 6 डिसेंबर 2022 रोजी दिला होता.

तसेच त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार हणजूण पंचायतीने अहवाल सादर केला. गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार बेकायदा बांधकामांची तपासणी करण्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. सीआरझेड भागातील बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

ज्यांच्याकडे अधिकृत परवानगी आहे त्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत तर ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या प्रक्रियेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. नोटिसा बजावलेल्या 204 बांधकामांच्या दस्तावेजांची छाननी सध्या सुरू आहे.

जीटीडीसीच्‍या जागेत 13 बेकायदा बांधकामे

हणजूण पंचायत क्षेत्रात किनारपट्टी भागात गोवा पर्यटन विकास महामंडळाचीही जागा आहे. या जागेत अतिक्रमण करून काहींनी अनधिकृत बांधकामे केली आहेत.

अशी सुमारे 13 बांधकामे आढळून आली आहेत. त्यांना बांधकामे हटवण्याची नोटिसा बजावल्या जातील नाही तर महामंडळातर्फे ती पाडली जातील असे महामंडळच्या वतीने ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने हणजूण पंचायत, जीसीझेडएमए तसेच महामंडळाला बेकायदा बांधकामाविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती येत्या 3 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी असे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT