Sand Smuggling
Sand SmugglingDainik Gomantak

Sand Smuggling: कारवाई केली तर तक्रार दाखल का नाही?

गोवा खंडपीठाचा सवाल : उत्तरेतून 260 घनमीटर रेती, 17 होड्या जप्त

Sand Smuggling: उत्तर गोव्यातील बेकायदा रेती उपसाप्रकरणी विविध भागात गेल्या तीन महिन्यांत मामलेदार तसेच भरारी पथकाने घातलेल्या छाप्यात 260 घनमीटर रेती व 17 होड्यांसह काही उपकरणे जप्त करण्यात आली.

या कारवाईनंतर पोलिस तक्रार का दाखल करण्यात आली नाही, असा प्रश्‍न आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अवमान याचिकेवरील सुनावणीवेळी उपस्थित केला.

याप्रकरणी उत्तर गोवा नोडल अधिकारी अजय गावडे यांना स्पष्टीकरण करण्यास सांगून पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किनारपट्टी भागात मामलेदारांकडून तसेच भरारी पथकाकडून गस्ती सुरू असून तसेच तक्रारी आल्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जात असल्याची माहिती नोडल अधिकारी गावडे यांनी दिली आहे.

अशाप्रकारे झाली कारवाई...

1) तोर्से-पेडणे येथून आलेल्या तक्रारीनुसार, घातलेल्या छाप्यात तेरेखोल नदीकिनारी 25 घनमीटर रेतीचा साठा जप्त करण्यात आला तसेच नदीकिनारी असलेल्या 3 होड्या जप्त करून त्या बंदर कप्तानच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत व त्याची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

2) सुर्ला फेरी धक्का येथे साठा करून ठेवलेली 7 घनमीटर रेती जप्त करून ती पुन्हा मांडवी नदीत टाकली.

3) न्हयबाग-पेडणे येथे तेरेखोल नदीच्या किनारी गस्तीवेळी 20 घनमीटर रेती आढळली.

4) सातार्डा पुलाखाली 10 घनमीटर रेती साठा सापडला. तसेच तेथे तीन होड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या किनारपट्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.

5) देवसू-कोनाडी येथे रेती उपसाप्रकरणी केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. मात्र, तेथे काहीच सापडले नाही.

Sand Smuggling
Vistara Airline : गोव्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर; व्हॅलेंटाईन डे दिवशी विस्तारा देणार मोठं गिफ्ट

6) कोलवाळ येथे केलेल्या कारवाईवेळी नदीकिनारी 9 घनमीटर रेती व एक होडी होती ती जप्त करण्यात आली. तसेच दोन मजूरही होते त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगण्यात आले.

7) उसगाव पुलाजवळ भामई येथे 7.5 घनमीटर रेती सापडली. ती मांडवीत जेसीबीच्या साहाय्याने फेकण्यात आली.

8) बार्देश तालुक्यात मामलेदारच्या नेतृत्वाखाली शापोरा नदीकिनारी टाकलेल्या छाप्यात दोन मजूर होडीने रेती उपसा करत असल्याचे आढळून आले. होडी जप्त करून बंदर कप्तानकडे देण्यात आली तरी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मजुरांना कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Sand Smuggling
Watch Video: विर्डीच्या सभेसाठी लोकांना पैसे देऊन आणले का? पाहा काय म्हणाले साखळी पालिकेचे नगरसेवक

9) तिसवाडीच्या संयुक्त मामलेदारांनी गवंडाळी, आखाडा-सांत इस्तेव्ह येथे 2 ठिकाणी केलेल्या कारवाईत अनुक्रमे 25 व 65 घनमीटर रेतीचा साठा जप्त करण्यात आला. ही सर्व रेती पीडब्ल्यूडी विभागाच्या मदतीने जेसीबीने मांडवी नदीत टाकण्यात आली.

10) डिचोली मामलेदार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत सुर्ला फेरी धक्का येथून 5 घनमीटर रेती होडीसह जप्त करण्यात आली. तसेच 7 घनमीटर रेती तेथे किनाऱ्यावर साठा करून ठेवण्यात आली होती तीसुद्धा जप्त केली. रेती काढण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री डिचोली पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी सुपुर्द करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com