Goa Liberation Day Story Of Mohan Ranade Dainik Gomantak
गोवा

Mohan Ranade: तिरंग्याचा अवमान करणाऱ्या पोलिसावर गोळ्या झाडल्या, 14 वर्षे पोर्तुगालमध्ये तुरुंगवास; गोष्ट गोवा मुक्तीसाठी लढलेल्या मराठी माणसाची

Goa Freedom Fighter Mohan Ranade: गोवा मुक्तीनंतर देखील ८ वर्षे रानडे यांना तुरुंगात काढावी लागली. त्यांच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न झाले.

Pramod Yadav

Goa Liberation Day Story Of Mohan Ranade

पणजी: भारताचाच भाग असून गोव्याला स्वतंत्र होण्यासाठी १४ वर्षे वाट पाहावी लागली. डॉ. राममनोहर लोहियांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत हळुहळू सर्वत्र पसरली. गोमंतकीय स्वातंत्र्यासाठी पेटून उठले. अखेर, भारतीय सैनिकांच्या ऑपरेशन विजयनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. गोवा मुक्ती संग्रामात अनेक क्रांतीवीर जीवाची बाजी लावून झटले, त्यापैकी एक म्हणजे मराठमोळे मोहन रानडे.

Mr And Mrs Ranade

मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९३० रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एका ब्राम्हण कुटुंबात झाला. आर. के. बर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन रानडे १९५० रोजी गोव्यात दाखल झाले. पेडण्यात मराठी शिक्षक म्हणून ते काम करत. पण, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले अन् ते गोव्यातून फरार झाले.

Portuguese Territory

विष्णुपंत वाझे यांच्या मदतीने याच वर्षी ते पुन्हा गोव्यात आले. यावेळी त्यांनी सावईवेरे ज्ञानदानाचे काम केले. १९५३ साली त्यांनी आझाद गोमंतक दलात सहभागी झाले. कस्टाडिओ फर्नांडिस या पोलिसाने भारतीय तिरंग्याचा अवमान केला म्हणून १८ ऑगस्ट १९५५ साली त्याची रानडे यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तसेच, २२ ऑक्टोबर १९५५ साली बेती पोलिस स्थानकावर छापा टाकला.

Mohan Ranade

यानंतर रानडे यांना अटक करुन २६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. लिस्बन येथील कॅक्सियास तुरुंगात त्यांनी २२ ऑक्टोबर १९५५ ते २३ जानेवारी १९६९ एवढी वर्षे तुरुंगवास भोगला. गोवा मुक्तीनंतर देखील ८ वर्षे रानडे यांना तुरुंगात काढावी लागली. त्यांच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न झाले पण, यश येत नव्हते.

CM Annadurai meeting the Pope

अखेर तामिळनाडूचे तत्कालिन मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी व्हॅटीकन सिटीला भेट देत पोपची भेट घेतली आणि रानडे यांच्या सुटकेसाठी पोर्तुगीज सरकारवर दबाव निर्माण करण्याची विनंती केली. जानेवारी १९६९ मध्ये सुटकेनंतर रानडे इटलीमार्गे मुंबईत दाखल झाले आणि अखेर मुक्त गोव्यात पाऊल ठेवले.

Mohan Ranade Book

मोहन रानडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ जून २०१९ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. 'सतीचे वाण' पुस्तकातून रानडे यांनी त्यांचा जीवनप्रवास उलघडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT