Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ

Goa casino extension 2027: कॅसिनोंना शेवटची असे सांगत सहा महिन्यांसाठी आजवर मुदतवाढ देण्यात आली आहे.
Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ
Casino Panjim GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa casino extension 2027

पणजी : राज्यातील कॅसिनोचालकांवर सरकार मेहरबान झाले आहे. मांडवी नदीतील सहाही कॅसिनोंना सहा महिन्यांची नव्हे तर सरसकट मार्च २०२७ पर्यंतची मुदतवाढ सरकारने दिली आहे.

मांडवी नदीतील कॅसिनोंवर त्यांना स्थलांतर करावे लागणार अशी टांगती तलवार होती. सहा महिन्यांची मुदतवाढ मंत्रिमंडळ आजवर देत आले आहे. मध्यंतरी कॅसिनो धारगळ येथे हलवणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्याला स्थानिकांचा विरोध होता.

भाजपविरोधात असताना त्यांनी मांडवी नदीतील कॅसिनो हटवावेत यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर कॅसिनोंना शेवटची असे सांगत सहा महिन्यांसाठी आजवर मुदतवाढ देण्यात आली आहे.

Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ
Sanjay Singh: मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नीने संजय सिंहविरोधात मानहानीचा खटला का दाखल केला? आप नेत्याचं 'तर्कशास्त्र' वाचा

आताही मुख्यमंत्र्यांनी 'ही शेवटची मुदतवाढ' असा शब्दप्रयोग केला आहे. विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल, असे डोळ्यांसमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याचे दिसते. निवडणुकीवेळी हा मुद्दा चर्चेला येणार नसल्याची तजवीज आतापासूनच सरकारने करून घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com