Vijai Sardesai X
गोवा

Margao Hospital: मडगाव जिल्हा इस्पितळात अपुरे खाट, रुग्णांची आबाळ; मग नर्सिंग महाविद्यालय कशासाठी? सरदेसाईंचा सवाल

Vijai Sardesai: हे इस्पितळ लोकांसाठी अपुरे पडल्यास नवीन इस्पितळ बांधणार की या इस्पितळात सुरू केलेले महाविद्यालय बंद करणार? असा सवालही विजय सरदेसाई यांनी केला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात खाटांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांवर व्हिलचेअरवर बसवून उपचार करण्याची पाळी डॉक्टरांवर येत आहे आणि दुसऱ्या बाजूने हे सरकार रिकाम्या ठेवण्यात आलेल्या वरच्या दोन मजल्यांवर नर्सिंग महाविद्यालय सुरू करू पाहात आहे, अशी टीका फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

या इस्पितळात खाटांच्या उपलब्धतेसह अनेक सोयीसुविधांची गरज आहे. रुग्णांची पुरेशी सोय करू न शकणाऱ्या या इस्पितळात नर्सिंग महाविद्यालय का? असा सवाल त्यांनी केला आहे.

एका फिट्स येणाऱ्या रुग्णाला आज या इस्पितळात नेण्यात आले असता, तेथे खाट उपलब्ध नसल्याने त्याला व्हिलचेअरवर ठेवण्यात आले.

या इस्पितळातील पुरुषांच्या वॉर्डमध्ये एकूण ७५ खाटा असून तेथे सध्या ८५ रुग्ण आहेत. पुढील २५ वर्षांची गरज ओळखून हे इस्पितळ उभारण्यात आले होते. या इमारतीचा पूर्ण वापर करण्यासाठी त्या इमारतीत भलतेच प्रकल्प हे सरकार का राबवू पाहात आहे? उद्या हे इस्पितळ लोकांसाठी अपुरे पडल्यास नवीन इस्पितळ बांधणार की या इस्पितळात सुरू केलेले महाविद्यालय बंद करणार? असा सवालही विजय सरदेसाई यांनी केला आहे.

‘विकासकामांसाठी विश्वासात घेतले जात नाही’

वास्तविक असे निर्णय घेताना स्थानिक लोक प्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे असते, पण माझ्या मतदारसंघात हे इस्पितळ असूनही त्यात नर्सिंग महाविद्यालय सुरू करावे की नाही यावर माझे कुणी मत घेत नाही. सोनसोड्यावर कशाप्रकारचे नगरवन उभे करावे याबद्दलही मला कुणी विचारलेले नाही किंवा मडगावचा बृहत आराखडा तयार केला जात असतानाही स्थानिक आमदार म्हणून कुणी विश्वासात घेत नाही. भाजप सरकार राज्याचा कारभार चालवत आहे की गावोगावी जाऊन फक्त कार्यकर्त्यांचे मेळावेच घेत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison Attack Goa: गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, बोणये-सावईवेरे परिसरातील डोंगर भागात हैदोस वाढला

Numerology Prediction: शनि आणि गुरूचा प्रभाव मिळवून देईल मोठा लाभ; गुरुवारचा दिवस 'या' मूलांकांसाठी ठरणार खास

Goa: 28 फेब्रुवारी 2014 पूर्वी बांधलेली घरं होणार कायदेशीर! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

SCROLL FOR NEXT