Anjuna Police team with arrested accused Dainik Gomantak
गोवा

Shootout at Siolim : दारू दिली नाही म्हणून शिवोलीत बारमध्ये गोळीबार

धमकी आणि मारहाण : 24 तासांत तिघांना अटक

दैनिक गोमन्तक

Shootout at Siolim Hotel : दारू पिण्यास दिली नाही, तसेच बारमधून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री वाडी-शिवोलीतील एल-पेत्रोन या बार व रेस्टॉरंटमध्ये म्हापशातील पाच जणांच्या टोळक्याने गोळीबार केल्याची थरारक घटना घडली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी 24 तासांत तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेम्स डिसोझा (वय ४४, रा. धुळेर-म्हापसा) हा असून महम्मद मनियार (वय २९, रा. करासवाडा) आणि सूरज अनुपकुमार सिंग (वय१९, रा. करासवाडा) या तिघांना पोलिसांनी गजाआड केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री म्हापसा येथील जेम्स सावियो डिसोझा आणि इतर चार मिळून पाचजणांचा गट वाडी-शिवोली येथील एल- पेत्रोन या बार व रेस्टॉरंटमध्ये मद्यपानासाठी आले होते.

रात्री 1 वाजता बारचालक अक्षीत शेट्टी यांनी त्यांना मध्यरात्र झाल्याने दारू पिण्यासाठी देण्यास नकार दिला आणि त्यांना बारबाहेर जाण्याची ताकीद दिली. यावेळी बारचालक अक्षीत शेट्टी तसेच जेम्स आणि इतर चौघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले.

जेम्स याने शेट्टी यांच्या तोंडावर जोरदार ठोसा लगावला. शेट्टी यांना मारहाण होत असल्याचे दिसताच बारमधील वेटर तसेच इतर कर्मचारी शेट्टी यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले. त्यांनी जेम्ससह इतरांचा निकराने प्रतिकार केला.

यावेळी संतापलेल्या जेम्सने हातातील पिस्तूल काढून समोर आलेल्या उदय नामक कर्मचाऱ्याच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी उदयसह इतर कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. यावेळी अक्षीत शेट्टी व इतरांना मारहाणीची धमकी देत जेम्स आणि त्याच्या मित्रांनी तेथून काढता पाय घेतला.

बुधवारी सकाळी या प्रकरणाची तक्रार अक्षीत शेट्टी यांनी हणजूणच्या पोलिस ठाण्यात नोंदवली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत मुख्य सूत्रधार जेम्स डिसोझा, महम्मद शाहीद आणि सूरज सिंग या तिघांच्या मुसक्या आवळल्या. म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशाल देसाई पुढील तपास करत आहेत.

रस्त्यावर केली दंगामस्ती

बारमधील धुमश्‍चक्रीनंतर म्हापशाकडे परतताना जेम्स आणि त्याच्या साथीदारांनी मार्ना-शिवोली येथे रस्त्यावर बरीच दंगामस्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुलाची एक रिकामी पुंगळी (शेल), तर जेम्सकडून पिस्तुल व चार जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात पाच संशयितांचा समावेश असून तिघांना अटक केली, तर दोघे अद्याप फरार आहेत. पोलिस संशयितांच्या मागावर आहेत.

सूत्रधार इस्पितळात भरती

सूरज सिंगला थिवी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले, तर जेम्स डिसोझा, महम्मद मनियार यांना मोरजीतील एका गेस्ट हाऊसमधून पोलिसांनी उचलले. जेम्स याला उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे जिल्हा इस्पितळात भरती केले आहे.

जेम्सचे कारनामे असे...

जेम्सला जून 2022 मध्ये म्हापसा शहरात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाली होती.जेम्सला मोरजी येथील रिसॉर्टमध्ये एका विदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणातही अटक झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT