Goa Child Pregnancies Dainik Gomantak
गोवा

Goa Child Pregnancies: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ; महिन्याला 'इतकी' प्रकरणे उघड

पालक, शिक्षकांनीही नसते कल्पना; गुन्हेगार बहुतांशदा ओळखीतील पुरूष

Akshay Nirmale

Goa Child Pregnancies: गोव्यात लहान मुलींच्या गर्भधारणेच्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. पुर्वी दर सहा महिन्यांमध्ये अशी एक किंवा दोन प्रकरणे समोर येत होती, आता मात्र या प्रमाणात दर महिन्याला दोन प्रकरणे इतकी वाढ दिसून येत आहे, अशी माहिती Victim Assistance Unit (व्हीएयू) चे प्रभारी एमिडियो पिन्हो यांच्या हवाल्याने इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

अलिकडच्या वर्षांत, Victim Assistance Unit (व्हीएयू) कडे दर महिन्याला बाल गर्भधारणेची सरासरी दोन प्रकरणे समोर आली आहेत. सहा महिन्यांपुर्वी अशी प्रकरणांची संख्या दर सहा महिन्यांना एक किंवा दोन अशी असायची. दरम्यान, नुकतेच युनिटमध्ये आणलेली अशी सर्वात लहान वयाची मुलगी 10 वर्षांची होती.

बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतही वाढ झालेली व्हीएयूला आढळून आले असून यात बहुतांशदा घरातीलच वयाने मोठ्या पुरूषांचा मोठा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, बाल गर्भधारणांच्या प्रकरणांमध्ये पालकांना किंवा शिक्षकांना याबाबत काहीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे.

काही मुलींना मासिक पाळी आलेली नव्हती, तरीदेखील त्यांच्या मातांना याबाबत कल्पना आली नाही. नऊ महिन्यानंतर पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुलींना डॉक्टरांकडे नेल्यावर गर्भधारणा झाल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे.

त्यानंतर मग अशा प्रकरणांत गुन्हा नोंदवला जातो आणि संबंधित मुलीला समुपदेशनासाठी व्हीएयूमध्ये आणले जाते.

यातील गुन्हेगार 30 ते 40 या वयोगटातील आहेत आणि 95 % प्रकरणांमध्ये कुटुंबातीलच पुरूषांकडून किंवा शेजारी, कौटुंबिक मित्र, ओळखीतील व्यक्ती, भावंडाचे मित्र यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रकरणात भाडेकरूदेखील यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे.

काही गुन्हेगार इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया साईटवर अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवून त्यांचा गैरफायदा घेतात. व्हिडिओ कॉलवर पीडीतेला कपडे उतरवायला सांगून किंवा आक्षेपार्ह छायाचित्रे शेअर करायला लावतात.

त्याचाच वापर नंतर न्यायालयात रिलेशनशिपमध्ये असल्याचा पुरावा म्हणून पुरूषांकडून केला जातो.

दरम्यान, या समस्येवर VAU ने सहावीपासून लैंगिक शिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच विषारी नातेसंबंध काय आहेत आणि निरोगी संबंध काय आहेत हे मुला-मुलींना शिकवले पाहिजे, पालकांनी मुलांशी भावनिक बंध निर्माण करावा, असे सुचविले आहे.

आपली अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर केवळ पालकांना तर धक्का बसतोच पण त्यांना बऱ्याचदा गुन्हेगार सहज सुटताना पाहावे लागते. जेव्हा किशोरवयीन गर्भवती मुलीला आमच्याकडे आणले जाते, तेव्हा समुपदेशनानंतर निर्णय त्यांच्यावर सोपवला जातो.

एका प्रकरणात, पीडितेच्या पालकांनी नवजात मुलाला दत्तक घेतल्याचेही पिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT