Crime Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: धक्कादायक! छातीवर चाकूने वार करत मित्राचा केला खून, समोर आले 'हे' क्षुल्लक कारण

उसगाव येथील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Crime जेवण वेळेत बनविले नाही म्हणून भांडण उकरून काढून आपल्या सहकाऱ्यावर चाकूचे वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी मूळ बिहार व सध्या नाणूस-उसगाव येथे कामाला असलेला चुमनकुमार जालंदर शहा (२८) याला अटक केली आहे. मयत कामगाराचे नाव राजन ऊर्फ अकलू मुन्नालाल शहा (३५) असे आहे.

नाणूस-उसगाव येथील ‘ट्रॉपिकल मशरूम्स’ या प्रकल्पात कामगार असलेले चुमनकुमार व राजन यांच्यात १० जूनला कडाक्‍याचे भांडण झाले. जेवण करण्याची प्रत्येक कामगाराची पाळी ठरलेली होती, मात्र राजनने वेळेत जेवण केले नाही म्हणून चुमनकुमार याने त्‍याच्‍याशी वाद घातला आणि भांडण केले.

शिवीगाळ केल्यानंतर हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनी मारामारी केली. त्यात चुमनकुमारने चाकूने राजनच्या आणि पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे राजन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.

या प्रकरणी ‘ट्रॉपिकल मशरूम्स’ या प्रकल्पाचे सर्वेक्षक सतीश गावडे यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित चुमनकुमार याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अधिक तपास सुरू आहे.

उपचार करून परतला, पण…!

रक्तबंबाळ स्‍थितीत राजन ऊर्फ अकलू मुन्नालाल शहा याला इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार करून पुढील उपचारांसाठी त्‍याला बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले.

तेथून तो 11 जून रोजी खोलीवर परतला, परंतु दुसऱ्याच दिवशी त्याला अत्यवस्‍थ स्थितीत पुन्हा इस्पितळात नेण्याच्या तयारीत असतानाच तो खाली कोसळला व मरण पावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT