Salcete News: राय ग्रामपंचायतीच्‍या साहित्य खरेदीतला तब्बल 'एवढ्या' लाखांचा घोटाळा उघड

उपसंचालकांचा अहवाल : पंचायत संचालनालय करणार कारवाई

Financial fraud
Financial fraudDainik Gomantak
Published on
Updated on

Financial fraud साहित्य खरेदीत घोटाळा करण्‍यात आल्‍याची तक्रार राय ग्रामपंचायतीच्‍या काही पंचायत सदस्यांनी केल्यानंतर पंचायत खात्याने दक्षिण गोव्यातील उपसंचालकांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली असता, 14 व्या वित्त आयोगाखाली मंजूर केलेल्या साहित्य खरेदीत जवळजवळ 85 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे आढळून आले आहे.

राय पंचायतीसाठी साहित्य खरेदी करताना पंचायतीने योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचे अहवालात नोंद करण्यात आले आहे.

हा अहवाल आता पंचायत प्रशासन संचालनालयाला सादर करण्यात आलाय. या अहवालाच्या आधारे संचालनालय पुढील चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे समजते.


Financial fraud
Greek Sculptures: श्रमिकांच्या प्रचंड पिळवणुकीचे आरसे

आंतोनियो फर्नांडिस, क्विनी डिकुन्हा, मिंगेलिना डिसोझा, मान्‍यूएल रॉड्रिगीस व इतर पंचसदस्यांनी साहित्य खरेदीबाबत तक्रार केल्यावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो तसेच पंचायत प्रशासन संचालनालयाने सासष्टी बीडीओंना चौकशी करण्याचा व अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. हा अहवाल ९ जून रोजी सादर करण्यात आला.

१४व्या वित्त आयोगाकडून मिळालेले ८५ लाख रुपयांचे अनुदान ऑक्टोबर २०२२ पर्यंत खर्च करण्यात आले नव्हते. खर्च न झालेला निधी आर्थिक वर्षाच्या शेवटी सरकारकडून मिळविला जाईल असे सरपंच व सचिवाने सांगितले होते, असेही पंचसदस्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.


Financial fraud
Restaurant: सी पेबल्स सिर्फ नाम ही काफी

अहवालात काढण्‍यात आलेले निष्कर्ष

1.सचिवाने ग्रामविकास समिती बैठकीच्या इतिवृत्तांत बदल केला.

2. काही साहित्य खरेदीला आक्षेप असूनही प्रक्रिया पुढे रेटली.

3. खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याचा तांत्रिक तपशील, मेक, मॉडेल नंबर, दर्जाचे काहीच वर्णन करण्यात आले नाही.

4. खरेदीसंदर्भातील तुलनात्मक निवेदन कुठल्याही बैठकीत सादर करण्यात आलेले नाही.

5. साहित्य खरेदी केल्यावर ते कसे व कुठे वाटप केले जाईल हे ठरविण्यासाठी ग्रामविकास समितीची बैठक बोलावली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com