Sao Jose de Areal South Goa  Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाद; सां जुझे दी अरीयाल पंचायतीकडून 'स्टॉप वर्क ऑर्डर' जारी

सां जुझे दी अरीयाल पंचायतीने कार्मिला फर्नांडीस यांच्या तक्रार अर्जाचा संदर्भ घेत सरताज माकंदर यांना ही स्टॉप वर्क ऑर्डर पाठवली आहे.

Pramod Yadav

Sao Jose de Areal South Goa

सासष्टी तालुक्यातील सां जुझे दी अरीयाल येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन आज शिवजयंती दिवशी मोठा वादंग पाहायला मिळाला.

पुतळा आवश्यक परवानगी न घेता बेकायदेशीपणे उभारण्यात आल्याचा आरोप काही स्थानिकांनी केल्यानंतर आता सां जुझे दी अरीयाल पंचायतीकडून स्टॉप वर्क आदेश जारी करण्यात आले आहेत.

सां जुझे दी अरीयाल पंचायतीने कार्मिला फर्नांडीस यांच्या तक्रार अर्जाचा संदर्भ घेत सरताज माकंदर यांना ही स्टॉप वर्क ऑर्डर पाठवली आहे.

सां जुझे दी अरीयाल पंचायत क्षेत्रातील सर्व्हे नंबर 229/2 मध्ये गोवा पंचायत राज कायदा 1994 अंतर्गत बेकायदेशीर काम सुरु केले आहे. संबधित आस्थापनांकडून परवानगी न घेता काम केल्याचे पंचायतीन आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, तात्काळ हे काम थांबवून आवश्यक परवाने आणि कागदपत्रांसह पडताळणीसाठी हजर राहावे असे आदेश पंचायतीने जारी केले आहेत. हजर न राहिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे सरपंच लिंडा फर्नांडीस यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT