Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Shivjayanti Dabolim: छत्रपती शिवराय सर्व धर्मीयांचे रक्षक! मंत्री गुदिन्होंचे गौरवोद्गार; दाबोळी येथेे शिवजयंतीनिमित्त अभिवादन

Mauvin Godinho: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त दाबोळी-चिखली येथे मुरगाव हिंदू समाज संघटनेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर गुदिन्हो बोलत होते.

Sameer Panditrao

वास्को: संपूर्ण जगाने शिवरायांचा आदर केला तो त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व धर्मीयांना एकत्रित घेऊन कार्य करण्याची क्षमता होती. म्हणून आजही शिवरायांना संपूर्ण विश्वात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त दाबोळी-चिखली येथे मुरगाव हिंदू समाज संघटनेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर गुदिन्हो बोलत होते.

यावेळी राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, चिकोलणा बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, नगरसेवक विनोद किनळेकर, अमय चोपडेकर, माजी उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर, दि भंडारी पंत संस्थेचे उपाध्यक्ष नवनाथ नाईक, दाबोळी भाजप गटाध्यक्ष सचिन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हानंद पवार, शिवप्रेमी किरण नाईक, दिशांत परब, नेहाल केणी आदी उपस्थित होते.

गुदिन्हो पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व आजच्या युवापिढीने आपल्या अंगी बाळगले पाहिजे. भारतीय संस्कृती आणखीन पुढे नेण्यासाठी ''शिवराया'' सारखे कार्य करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. देशातील युवा शक्तीला चांगले व्यासपीठावर उपस्थित करून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार पुढाकार घेत असे ते म्हणाले.

घुमट महाआरती

यावेळी मुरगाव, वास्को, दाबोळी व कुठ्ठाळी भागातील १५० पेक्षा जास्त युवकांनी ''घुमट महाआरती'' सादर केली. महाआरतीची रचना रोहन पाटील, आत्माराम शेटकर, शेखर च्यारी व इतरांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT