Shivaji Maharaj: धर्मांतरणाला ऊत आलेला, मंदिरे नष्ट केली जात होती; गोव्यातील जुलमी पोर्तुगीज सत्तेला शिवरायांनी दिलं प्रथम आव्हान

Shivjayanti Goa: शिवपूर्व काळात आदिलशाह, निजाम, मोंगल अशा परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रातील जनतेला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले होते.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सुभाष पंढरी देसाई

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, देश, धर्म, संस्कृतीचे रक्षणकर्ते, लोकांच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटवणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५वी जयंती साजरी होत आहे. मराठी संस्कृतीचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सामान्य माणसाची असामान्य कर्तृत्वगाथा म्हणजे शिवशाही.

शिवपूर्व काळात आदिलशाह, निजाम, मोगल अशा परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रातील जनतेला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले होते. भर दिवसा माय भगिनींची अब्रू लुटली जात होती. धर्मभ्रष्टतेला, जबरदस्तीने धर्मांतरणाला ऊत आला होता. हिंदूची मंदिरे, धार्मिक स्थळे नष्ट करून त्या जागी मशिदी उभारल्या जात होत्या.

लोकांच्या घरांना आगी लावल्या जात होत्या. भातशेती उद्ध्वस्त केली जात होती. सर्वत्र मुसलमानी सैतानी भुतावळींचा नंगानाच सुरू होता. महाराष्ट्रातील सरदार, वतनदार आपापसात भांडत होते. त्याचा फायदा या परकीय आक्रमकांनी आपल्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी घेतला.

मरगळलेल्या मराठी मनात स्वाभिमान व जोम निर्माण करण्याचे कार्य शिवरायांनी केले. राजमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांच्या मनात या अत्याचारी प्रवृत्तीच्या विरोधात चीड निर्माण करून स्वराज्य आणि स्वातंत्र्याविषयीची निष्ठा निर्माण केली. जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे सत्य प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना बळ दिले.

त्यानंतर जिद्दी, चतुर, शिवबांनी लाचारीचे जीवन जगणाऱ्या मोगलांची हुजरेगिरी करणाऱ्यांना आपापसात भांडणाऱ्या मराठ्यांना स्वातंत्र्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी लढा देण्याची प्रेरणा दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Shivjayanti 2025: शिवरायांचे उदाहरण देत शंभुराजांना उपदेश करणाऱ्या समर्थांच्या 'त्या' पत्राचा अर्थ काय?

त्यांना एकत्र आणले. बाणेदार, निश्चयी स्वभावाच्या शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. बाजीप्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, जिवाजी महाला, शिवा काशिद, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजीराव जाधव अशा असंख्य इमानी, जिवाला जीव देणाऱ्या, काटक, चिवट, चपळ धाडसी मावळ्यांची फौज निर्माण केली. विस्तार भयास्तव अनेक महत्त्वाच्या सेनानींची यादी येथे देता येत नाही. ते सर्वार्थाने सहिष्णू वृत्तीचे राजे होते.

गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला सर्वांत प्रथम आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. त्यामुळे गोव्यातील धर्मांतराला चाप लागला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक जीवन चरित्र, कर्तृत्वाची महती सर्व भारतीयांना समजावी म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराजांची हुशारी आणि धोरणं, पोर्तुगीजांना घाम फुटवणारी

आज संपूर्ण जगात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. शत्रूच्या प्रचंड सेनेला शिवाजी राजांनी आपल्या एकनिष्ठ मावळ्यांच्या मदतीने नामोहरम केले. गनिमी काव्याने प्रबळ शत्रूशी लढा दिला. त्यांचे निर्मळ चारित्र्य, अलौकिक पराक्रम, राष्ट्रनिष्ठा, आदर्श राज्यकर्ता व प्रशासक, सर्वधर्मसमभावाचे तत्त्व प्राणपणाने जपणारा, अशा अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांचे अतुलनीय साहस, उत्तुंग शौर्य, असामान्य बुद्धिमत्ता यांची गाथा देशवासीयांना युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांच्या जयंतीदिनानिमित्त शतशः प्रणाम!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com