Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिवजयंती अन् कार्निवल एकाच वेळी; मडगावात आज 500 पोलिस तैनात

वाहतुकीवर होणार परिणाम : शिवजयंती आणि कार्निवल एकाच वेळी असल्याने चिंता

दैनिक गोमन्तक

Goa News: फोडलेल्या रस्त्यामुळे पणजीतील स्मार्ट सिटीत कार्निवल मिरवणुकीने काल वाहतुकीचे तीन तेरा वाजविले या पार्श्वभूमीवर उद्या मडगावात कार्निवल आणि शिवजयंती यांच्या मिरवणुका एकाचवेळी निघणार असल्याने वाहतुकीवर विपरीत परीणाम होऊ शकतो. त्यासाठी पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तब्बल 500 पोलिस तैनात केले जातील.

उद्या दुपारी 3 वाजता होली स्पिरीट रस्त्यावरून कार्निवल मिरवणुक निघणार असून सायंकाळीं सातच्या सुमारास ती मडगाव पालिकेकडे पोहोचणार आहे. तर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हाउसिंग बोर्ड येथून शिवजयंती निमित्त काढलेली मिरवणूक सायंकाळी सातच्याच सुमारास लोहिया मैदानावर येणार असल्याने मडगाव शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिमाण होऊ शकतो.

मडगाव येथील कर्निव्हल मिरवणूक यापूर्वी रवींद्र भवन मार्गावर होत होती. मात्र यावेळी ही मिरवणूक मडगाव येथून काढली जाणार असल्याने होली स्पिरीट ते मडगाव पालिका हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मडगावनगरी सजली

कार्निव्हल मिरवणुकीसाठी मडगावनगरी सजली असून ठिकठिकाणी मुखवटे व पताका लावण्यात आल्या आहेत. पाच वर्षांनंतर पुन्हा पारंपरिक रस्त्यावरून रविवारी या मिरवणुकीचे आयोजन होणार आहे.

ही मिरवणूक होली स्पिरिट चर्चपासून दुपारी 3 वाजता सुरू होणार असून त्याची सांगता मडगाव नरपालिका चौकाजवळ होणार आहे. या मिरवणुकीवेळी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे.

पार्किंगमुळे कोंडी

मडगाव नगरपालिकेच्या मागून पोलिस स्टेशनच्या दिशेने जाणारा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्यात आला असला तरी या रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क करून ठेवतात. उद्या याकडे पोलीसांनी लक्ष ठेवले नाही तर वाहतूक कोंडी होऊ शकते. कुडचडे दिशेने जाणारी वाहने जरी पॉवर हाऊस मार्गाने वळविली असली तरी शिवजयंती मिरवणुकीमुळे या मार्गावर अडथळे येऊ शकतात.

मार्गात बदल : कुंकळ्ळीपासून नावेली मार्गाने मडगावात येणारी वाहने उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर सिने लता थिएटरकडून आबाद फरिया रोडवरून तर मडगावात येणारी वाहने बोर्डा रस्त्यावरून वळविली आहेत.

दोन्ही मिरवणुकांचा मार्ग वेगळा असल्याने वाहतुकीवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. तरीही सुरळीत वाहतूक असावी यासाठी सुमारे 500 पोलीस उद्या बंदोबस्तावर ठेवण्यात आले आहेत. त्यात सुमारे 100 वाहतूक पोलिसांचा सामावेश आहे. - संतोष देसाई, पोलिस उपअधीक्षक (मडगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT