Baba Ramdev in Goa: गोमंतभूमी ही योगभूमीच...

बाबा रामदेव : गोव्यातून वैदिक संस्कार, संस्कृतीचा प्रचार, प्रसार
Baba Ramdev in Goa
Baba Ramdev in GoaDainik Gomantak

Baba Ramdev in Goa: गोमंतभूमी ही ‘खा, प्या, मजा करा’साठी नसून या भूमीची खरी ओळख योगभूमी अशीच आहे. या भूमीत हरिद्वारप्रमाणे वैदिक संस्कार, संस्कृतीच्या प्रचार, प्रसाराचे मुख्य केंद्र सुरू करण्यात येईल. योगाभ्यास, उत्तम आरोग्यासाठी, आयुर्वेदिक उपचारासाठी गोव्यात पर्यटक, प्रवासी येतील.

गावागावांत, शहरांत योगाचे अध्ययन, अध्यापन सुरू होईल. त्यासाठी पतंजलीतर्फे संपूर्ण सहकार्य आणि सहभाग असेल, अशी घोषणा योगगुरू रामदेव बाबा यांनी मिरामार येथील तीन दिवसीय योग शिबिरात केली.

यावेळी व्यासपीठावर रामदेव बाबांसोबत ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही योगाभ्यास केला. यावेळी ब्राह्मीदेवी, मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. योग शिबिरात उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण आणि वैदिक जीवनशैलीचे महत्त्व योगगुरूंनी स्पष्ट केले.

Baba Ramdev in Goa
Goa Petrol-Diesel Price : देशातील इंधनाचे दर स्थिर, गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या

रामदेव बाबा पुढे म्हणाले, अलीकडे जगभर गोव्याची ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणारा प्रदेश अशी चुकीची ओळख निर्माण झाली आहे. ती बदलण्यासाठी गोव्यात वैदिक गुरुकुल स्थापन करण्यात येणार आहे. जीवनात योगाचा समावेश करणे गरजेचे आहे. कोणताही रोग होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे.

66 बसेसमधून योगसाधक आले. तसेच स्वतःच्या वाहनाने अनेकजण आले होते. 10 हजार साधकांनी योग शिबिरात भाग घेतला.

आबालवृद्धांचा सहभाग

  • योग शिबिरात पहाटे 4 वाजल्यापासूनच आबालवृद्धांचे येणे सुरू झाले होते. 200 स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी योगसाधकांची व्यवस्था केली होती.

  • कुठेही गडबड, गोंधळ न होता, किमान तीन ते चार तास शिबिर चालले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात योगाभ्यास केला.

  • यावेळी काही पालक मंडळी छोट्या मुलांसह उपस्थित होते. आपल्या पालकांसमवेत ही छोटी मंडळीसुद्धा शांतपणे योगाभ्यासात मग्न होती. पहाटे 5 ते सकाळी 7.30 वाजेपर्यंत साधकांनी योगगुरू रामदेव बाबांच्या सूचनांप्रमाणे योगाभ्यास केला.

समुद्र किनाऱ्यावर आनंदी शिवरात्रोत्सव

शिवरात्री उत्सव म्हणजे घरोघरी धार्मिक वातावरण असते. प्रत्येकाला शिवमंदिरात जाण्याची घाई असते. यंदा प्रत्यक्ष योगगुरू रामदेव बाबांच्या सान्निध्यात पहाटेच समुद्रकिनाऱ्यावर शिवभजन ऐकण्याची, त्या भजनाच्या तालावर योग, प्राणायाम करण्याची संधी मिळाली. शिवाय मिरामार किनाऱ्यावरच अभिषेकांची संधी प्राप्त झाली. अनेकांनी इतरत्र मंदिरात जाण्याचा बेत रद्द केला. कारण मिरामार सुमद्रकिनाऱ्यावर योगाभ्यास, भजन आणि शिवरात्रीनिमित्त अभिषेक विधीही पूर्ण झाला. अशा या शिवरात्री उत्सवात योगसाधक शनिवारी पहाटेपासूनच आनंदी झाले.

Baba Ramdev in Goa
Goa Carnival: कार्निव्हलवेळी राजधानी गुदमरली!

उत्तम सुविधा

पत्रकार, महनीय व्यक्ती, साधकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. आसन व्यवस्थेच्या ठिकाणी पादत्राणे बाहेरच काढून जाणे सक्तीचे केले होते. शिवाय वेगवेगळ्या फाटकांतून साधकांना आत सोडले जात होते. त्यामुळे कुठेही गर्दी, गोंधळाचे वातावरण नव्हते. सगळीकडे शांतता होती. प्रत्येकजण शिस्तबद्धपणे वागत होता.

शौचालयांचीही उत्तम सोय होती. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक होते. कोणती सुविधा कुठे आहे, कसे जायचे हे मराठी, हिंदी, कोकणीतून सांगण्यात येत होते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्यांनाही भाषेची अडचण झाली नाही. सर्वांनी आयोजकांच्या उत्तम सुविधेचे कौतुक केले.

योगासाठी एक तास द्या - रामदेव

समुद्र किनाऱ्यावर सनातन धर्म संघातर्फे आयोजित योग शिबिराची सुरुवात भव्य स्वरूपात झाली. प्रत्येक व्यक्तीने आपले वेळापत्रक कितीही व्यस्त असले, तरीही योगासनांसाठी एक तास द्यायला हवा. आपल्या जीवनात आरोग्याला नेहमीच प्राधान्य पाहिजेत. निरोगी जीवनांची गुरुमंत्र देण्यासाठीच या शिबिराचे आयोजन केले आहे, असेही योगगुरूंनी सांगितले.

Baba Ramdev in Goa
Goa Crime: हैदराबादच्या दोघांना गोव्यात ठेवले ओलिस; 4 कोटी खंडणीची मागणी

महाशिवरात्रीनिमित्त भजन : शिबिरात योगाभ्यास करताना महाशिवरात्रीनिमित्त रामदेव बाबांनी शिवरात्रीचे महत्त्व सांगितले. शिवाच्या नामजपातच आसन, प्राणायाम करण्यास सांगितले. महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरणात साधकांचा भक्ती, योगाभ्यास झाला.

अनेकांनी जागरण करून शिबिरात भाग घेतला होता; पण जागरणाचा ताण कुठे दिसला नाही. इतके उत्साही वातावरण होते. पहाटेच्या रमणीय वातावरणात योग शिबिर पार पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com