Shiv Jayanti 2024 Dainik Gomantak
गोवा

Shiv Jayanti 2024: 350व्या शिवराज्याभिषेक जयंती निमित्ताने महाराष्ट्र मंडळाच्या पुरस्कारांची घोषणा...

महाराष्ट्र मंडळ गोवाच्या वतीने शिवजयंती निमित्त देण्यात येणाऱ्या सेवा सन्मान अर्थात हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्कारांची घोषणा पणजी येथे करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Shiv Jayanti 2024

महाराष्ट्र मंडळ गोवाच्या वतीने शिवजयंती निमित्त देण्यात येणाऱ्या सेवा सन्मान अर्थात हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्कारांची घोषणा पणजी येथे करण्यात आली.यावेळी पत्रकार परिषदेला मंडळाचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव विजय कुडाळकर, केंद्रीय समिती प्रमुख विशाल गायकवाड, अंजू देसाई यावेळी उपस्थित होते.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये पर्यावरण संरक्षक, सनदी अधिकारी डॉ. प्रदीप सरमोकादम, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे समुद्री शास्त्रज्ञ डॉ. एस.जी.प्रभू मातोंडकर पर्यावरण शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ मा. सुजितकुमार डोंगरे , आंतरराष्ट्रीय टोस्टमास्टर डॉ. शेख शकील , दुर्ग संशोधक मा. मारुती गोळे यांचा समावेश आहे.

19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता पणजीतील मिरामार येथील युथ हॉस्टेल येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, श्रीमंत हिरोजी इंदुलकर यांचे वंशज आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.

यावेळी दुर्ग अभ्यासक प्राध्यापक संदीप मुळीक यांचे मराठीदेशा फाउंडेशनने प्रकाशित केलेले गोव्यातील किल्ल्यांची परिपूर्ण माहिती देणारे पहिले रंगीत पुस्तक 'गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर' या पुस्तकाचे प्रकाशन होईल.

यंदा स्वराज्य संस्थापक, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 18 आणि 19 फेब्रुवारी या 2 दिवशी पणजीत साजरी होत आहे. 18 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक प्रा. संदीप मुळीक यांचे गोव्यातील गडकिल्ल्यांच्या छायाचित्रे असलेले 'गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर' हे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रा. मुळीक यांच्यासह मराठीदेशाचे डॉ. दामोदर मगदूम उपस्थित असतील. त्याचवेळी मंडळामार्फत मुले व महिलांसाठी रांगोळी, वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि मैदानी स्पर्धां आयोजित केल्या आहेत.

आरोग्य शिबिराचे आयोजन

18 आणि 19 फेब्रुवारी रोजी दिवसभर प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग यांच्या युवीकॅन फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. यशराज भुसनार आणि डॉ. नरेश दिघे यांच्या सौजन्याने आरोग्य शिबीर, मानसिक तणावावर आयुर्वेदिक उपचार व जनरल तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आला आहे.

सप्तकोटेश्वर ते मिरामार मशाल मिरवणूक

सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिरात स्व. वासंती विठू गावस चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष नेहा शैलेश आंग्रे- गावस यांच्या हस्ते पूजा करून नार्वे ते पणजी अशी मशाल मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी गोरखनाथ केरकर उपस्थित असतील त्यानंतर मिरामार येथे संजय हंद्राळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे अभिषेक, पूजन व आरती होईल.

दुर्गा अभ्यासकांचे व्याख्यान

19 फेब्रुवारी रोजी 4.30 वाजता मिरामार सर्कल ते युथ हॉस्टेल दरम्यान ढोल पथकाच्या वादनाने छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक निघेल. सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक संदीप मुळीक यांचे 'गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर' हे व्याख्यान होईल त्यांनी सलग चार वर्ष गोमंतकातील गडकिल्ल्यांचा अभ्यास केला आहे.

तर 6.30 वाजता वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरोजी इंदुलकर सेवा सन्मान पुरस्कारांचा वितरण होईल. 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा होईल.

कार्यक्रमस्थळी खाद्य महोत्सव

18 आणि 19 फेब्रुवारी या दिवशी अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा महोत्सव कार्यक्रम स्थळी आयोजित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पणजीत पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री खोळंबले

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT