Goa Dairy  Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरी उत्पादन वाढवणार : शिरोडकर

गोवा डेअरीचे दूध उत्पादन येत्या वर्षभरात एक लाख लीटरपर्यंत नेले जाईल

दैनिक गोमन्तक

फोंडा: गोवा डेअरीचे दूध उत्पादन येत्या वर्षभरात एक लाख लीटरपर्यंत नेले जाईल, त्यासाठी सरकारकडून संचालक मंडळासह अधिकाऱ्यांकडून धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज (सोमवारी) कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरी प्लांटला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

(Shirodkar's statement that Goa will increase dairy production)

सुभाष शिरोडकर यांनी गोवा डेअरीच्या प्लांटला भेट देऊन पाहणी केली व नंतर संचालक मंडळ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर सोबत गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई तसेच संचालक व एमडी पराग नगर्सेकर व अधिकारी हजर होते.

शेअर्समध्ये रूपांतर

गोवा डेअरीचे पीएमसी बँकेत आठ कोटी रुपये ठेवत आहेत. मात्र पीएमसी बँक दिवाळखोरीत गेल्यामुळे हे आठ कोटी बुडण्याची शक्यता असल्याने ठेव म्हणून ठेवलेले हे पैसे शेअर्सच्या रूपात परावर्तीत करण्यात येतील. त्यामुळे आहे तेवढे पैसे गोवा डेअरीला परत मिळतील, असेही सुभाष शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध केले शिथिल; जागतिक बाजाराला दिलासा

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT