डिचोलीतील ‘ती’ गुहा बंद

जनतेत संभ्रम : काट्याकुट्यांनी वाट अडवली; उत्सुकता कायम
Caves
CavesDainik Gomantak

डिचोली: डिचोलीतील ''त्या'' गुहेविषयी उत्सुकता वाढली असतानाच ''ती'' गुहाच बंद करण्याचा प्रकार समोर आला आहे. झुडुपे आणि काटेकुटे टाकून या गुहेचा समोरील भागच पूर्णपणे झाकून टाकण्यात आला आहे.

(Caves in bicholim closed)

Caves
दुधाच्या अल्प पुरवठ्यामुळे राज्यात चिंता

ही गुहा इतिहासकालीन की खनिज मालाचा शोध घेण्यासाठी खोदण्यात आलेले भुयार, त्याविषयी खरा प्रकार उघड झाला नसतानाच आणि गुहेविषयी विविध मते व्यक्त होत असताना गुहाच बंद केल्याने डिचोलीत संभ्रमाचे वातावरण आहे. ही गुहा कोणी आणि का बंद केली, त्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. डिचोली पासून तीन किमी वरील धबधबा परिसरात रविवारी गुहा आढळली आहे.

लोकांमध्ये नाराजी

डिचोलीत गुहा आढळून आल्याचे वृत्त पसरताच आज (सोमवारी) अनेकजणांची पावले या गुहेच्या स्थळी वळली होती. मात्र गुहाच बंद करण्यात आल्याने नागरिकांना या गुहेचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे त्याठिकाणी गेलेल्यांना निराश होवून माघारी परतावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com