Shiroda | Farm  Dainik Gomantak
गोवा

Shiroda Goa: शिड्डोटे येथे खाजन शेतीच्या बांधाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Shiroda: शेतकऱ्यांनी पेरलेल्या वायंगण शेतीत झुवारी नदी पात्रातील खारे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Shiroda: शिरोडा पंचायत क्षेत्रातील शिड्डोटे येथील बेळे नायकातर या मोठ्या खाजन शेतालगतच्या बांधाला शनिवारी 24 रोजी मध्यरात्री भरतीमुळे भगदाड पडून जवळ जवळ पाचशेहून जास्त शेतकऱ्यांनी पेरलेल्या वायंगण शेतीत झुवारी नदी पात्रातील खारे पाणी शिरल्यामुळे या शेतीला समुद्राचे स्वरूप प्राप्त होऊन शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शिड्डोटे खाजन फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर नाईक यांनी बांधाची पक्क्या स्वरूपात बांधकाम करून दुरूस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी आपला पावसाळी व वायंगणी शेतीचा पारंपरिक व्यवसाय चालूच ठेवलेला असून बेळे नायकातर या मोठ्या क्षेत्रफळाच्या खाजन शेतीची मशागत केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून दहा दिवसांपूर्वी बी पेरले होते. तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी आगाऊ रक्कम भरून नांगरणी करण्याचे ठरविले होते.

परंतु झुवारी नदीच्या पात्रात भरतीचे मोठ्या प्रमाणात पाणी येऊन बांधाला सुमारे आठ नऊ मीटरचे भगदाड पडले. त्यामुळे खारे पाणी शेतीत घुसले. हे पाणी आता शिड्डोटे येथील इतर शेतीतही शिरणार असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीची नांगरणी, बियाणांसाठी जवळ जवळ साठ हजार रूपये खर्च केल्याचे रत्नाकर नाईक या शेतकऱ्याने सांगितले.

सरकारने तातडीने भगदाड बुजवावे !

वर्षभर शेतीच्या उत्पन्नावर जगणाऱ्या पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा तोंडचा घासच हिरावला गेलेला आहे. सरकारने हे भगदाड लवकर बुजवून संपूर्ण बांधाची दुरूस्ती करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,असे असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर नाईक यानी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT