Shirgao Lairai Jatra Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: शिरगावात 'देवी'चा जयघोष, भक्तांना आस दर्शनाची; जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी 'लईराई'ला साकडे

Shirgao Lairai Jatra: भक्तांच्या हाकेला धावणारी ‘आई’, असा महिमा असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरवात होत असून, शिरगाव परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: भक्तांच्या हाकेला धावणारी ‘आई’, असा महिमा असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरवात होत असून, शिरगाव परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे. शिरगाव परिसरात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले असून, जत्रेसाठी देवस्थान समितीसह प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा जत्रा निर्विघ्नपणे साजरी होवो, असे साकडे समस्त भक्तगणांनी ‘लईराई’ मातेला घातले आहे.

धोंड भक्तगणांसह भाविकांना देवीच्या दर्शनाची आस लागली असून, कधी एकदा देवीची सेवा करायला मिळते, त्याची भाविकभक्तांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असले, तरी यंदाही जत्रेला भक्तांचा महापूर येणार, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा शिरगावात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ९६० पोलिस आणि २०० गृहरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय अग्निशमन दलासह अन्य आपत्कालीन यंत्रणा कर्मचऱ्यांसह सज्ज ठेवण्यात येणार आहेत. शिरगावात मोक्याच्या ठिकाणी मिळून ९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

होमकुंड स्थळाजवळ पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, या कक्षातून सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून राहणार आहे. याशिवाय टेळहणी करण्यासाठी होमकुंड स्थळाजवळ मिळून ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लइराई मंदिराच्या मागच्या बाजूने मिळून महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.

जत्रेच्या पूर्वसंध्येला उतर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव आणि पोलिस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्या यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरगावमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आपत्कालीन वगळता अन्य वाहनांना आज मध्यरात्रीपासून शिरगावात प्रवेश बंदी केली आहे. वाहतूक पोलिसही तैनात केले आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या चेंगराचेंगरीप्रकरणी लईराई देवस्थानच्या विद्यमान समितीविरोधात मामलेदारांकडे दाखल करण्यात आलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. यामुळे ऐन जत्रोत्सव काळात विद्यमान देवस्थान समितीसमोरील एक संकट टळले आहे.

गेल्यावर्षी जत्रेच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अनेक भाविक जखमी झाले होते. या घटनेला विद्यमान समिती जबाबदार आहे. देवस्थान समिती व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरली होती, असा दावा करून देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी गेल्यावर्षी ७ मे रोजी दीनानाथ गावकर यांच्या अध्यक्षतेखालील विद्यमान देवस्थान समितीविरोधात डिचोलीच्या मामलेदारांकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीला अनुसरून मामलेदारांसमोर सुनावणीही झाली होती. मात्र, आता गणेश गावकर यांनी ही तक्रार मागे घेतली आहे. तसे पत्रही त्यांनी मामलेदारांना दिले आहे. वास्तविक गावकर यांनी दहा दिवसांपूर्वी तक्रार मागे घेतली असून, विद्यमान देवस्थान समितीने आता ही माहिती उघड केली आहे. तक्रार मागे घेतल्याने विद्यमान समितीसह देवस्थानच्या महाजनांनी समाधान व्यक्त केले आहे.

अग्निदिव्याच्या थराराची उत्सुकता

होमकुंड हे शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेचे खास वैशिष्ट्य. हे होमकुंड सर्वात मोठे असते. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने होमखंडी कुटुंबातर्फे होमकुंड रचण्यात येते. सोमवारी सायंकाळपर्यंत हे होमकुंड रचण्याचे काम पूर्ण झाले. ‘लईराई’ मातेचा जयघोष करीत उद्या मध्यरात्रीनंतर हजारो भक्तगणांच्या साक्षीत व्रतस्थ धोंड आणि देवी रखरखत्या होमकुंडातून अग्निदिव्य करणार आहे. अग्निदिव्याचा हा थरार पाहण्यासाठी भाविकभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘मोगरीं’चा सुगंध लागलाय दरवळू!

शिरगावची जत्रा म्हणजे ‘मोगरी’ फुलांचा उत्सव, अशी एक भावना आहे. त्यामुळे जत्रा काळात मोगरीच्या आट्या (वेणी), कळ्यांना प्रचंड मागणी असते. जत्रोत्सवानिमित्त सध्या शिरगावात आवक होत असून, आज मोठ्या प्रमाणात मोगरीची फुले उपलब्ध होती. फुलांना भाविकांकडून मोठी मागणी असते. या मोगरीच्या फुलांच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल जत्रोत्सवाच्या काळात होत असते. सध्या शिरगावात ‘मोगरीं’चा सुगंध दरवळू लागला असून कौलोत्सव आणि देवी मंदिरात जाईपर्यंत गावात मोगरींचा दरवळ कायम राहणार आहे.

देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेली श्री लईराई देवीची जत्रा साजरी करण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने देवस्थान समिती सज्ज झाली आहे. धोंड भक्तगणांसह प्रत्येक भाविकांची जत्रेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिरगाव सध्या भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात न्हाऊन गेले आहे. जत्रेत सहभागी होणाऱ्या धोंडांसह प्रत्येक भाविकांनी शिस्त पाळून आपली व इतरांची योग्य ती काळजी घ्यावी.

- दीनानाथ गावकर, अध्यक्ष, लईराई संस्थान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT