Lairai Jatra festival court notice Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: श्री लईराई जत्रोत्‍सवाच्‍या तयारीला वेग! आमदारांकडून आढावा; 10 एप्रिलपर्यंत सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश

Lairai Jatra Shirgao: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्‍सवाची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्‍सवाची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी ही जत्रा साजरी होणार आहे.

जत्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज शनिवारी शिरगाव येथे प्रशासन आणि देवस्थान समितीची संयुक्त बैठक पार पडली. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत व उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लईराई संस्थान सभागृहात ही बैठक झाली.

आमदारांकडून प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत धोंड तळी, होमकुंड आदी महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. सुरक्षाविषयक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला व आवश्‍यक सूचना केल्या.

श्री केळबाई देवीची पेठेची जत्रा

डिचोली (प्रतिनिधी) : मुळगाव-डिचोली येथील श्री केळबाई देवीची प्रसिद्ध ‘पेठेची जत्रा’ सोमवारी (ता. २३) साजरी करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (ता.२७) कौलोत्सव होऊन या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळपासून देवीच्या मंदिरात विविध पारंपरीक विधी होणार आहेत. दुपारी पवित्र तळीवर शुचीर्भूत होऊन व्रतस्थ धोंड भक्तगणांतर्फे देवीचा जयघोष करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT