Shirgao Agriculture Dainik Gomantak
गोवा

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Shirgao Agriculture: गेले चार-पाच दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पावसाने शेतीत पाणी साचून राहिले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेतीची धूप झाली असून भाताची रोपे मातीमोल झाली आहेत. गेले चार-पाच दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

पावसाने शेतीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे भाताची रोपे कुजली असून बळीराजा पुरता संकटात आला आहे.

आधीच खनिज व्यवसायामुळे शिरगावमधील शेतीवर परिणाम झाला आहे. बहुतांश शेतजमीन नापीक बनली आहे. त्यातच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने तडाखा दिल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ शिरगावमधील बळीराजावर आली आहे.

गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली आली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. परिणामी मुसळधार पाऊस कोसळला, की पाणी शेतीत भरते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा उशिराने का होईना बहुतांश शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली होती. मात्र, पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

'या गुन्ह्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालीय, जेनिटोला जामीन देऊ नका'; 'रामा'ची ठाम भूमिका

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

SCROLL FOR NEXT