AAP BJP Congress | Goa Politics
AAP BJP Congress | Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'कॅप्टन चढण्यापूर्वीच जहाज बुडाले', भाजपची आपवर बोचरी टीका; गोव्याच्या दोन्ही जागा काँग्रेसला

Pramod Yadav

Goa Politics

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि आपमध्ये अखेर तोडगा निघाला आहे. शनिवारी दुपारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि आपमधील जागा वाटपाची माहिती देण्यात आली. यात गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यामुळे दक्षिण गोव्यात आपने जाहीर केलेला उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे. यावरुन भाजपने आपवर जोरदार टीका केलीय.

"अपेक्षेप्रमाणे, कॅप्टन चढण्याआधीच जहाज बुडाले. बाणावलीचे आप आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांना माघार घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाला गोव्यात विजयाची शक्यता नाही. तडजोडीचे पूर्वसंकेत ओळखण्याचे गोमन्तकीयांमध्ये कौशल्य आहे. गोव्यासाठी भाजप हाच एकमेव पर्याय म्हणून उदयास आला आहे," असे गोव्याचे भाजप मिडिया सेलचे सहसंयोजक नवीन पै रायकर यांनी म्हटले आहे.

दक्षिण गोव्याची जागेचा आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत तडतोड करण्यासाठी साधन म्हणून वापर केला. यामुळे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दोघे उघडे पडले आहेत.

मी शक्यता वर्तवल्याप्रमाणे आपने ही जागा काँग्रेसला दिली आहे, यामुळे त्यांना ही जागा कधीही लढवायची नव्हती हे सिद्ध होते. राजकारण करुन गोमन्तकीयांची फसवणूक करणे थांबवा, असे भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून, गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढणार असल्याची आज (शनिवारी) घोषणा करण्यात आली.

दरम्यान, दक्षिण गोव्यात काँग्रेसचा विद्यमान खासदार असल्याने ती जागा काँग्रेसला मिळावी असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यानुसार राष्ट्रीय नेत्यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला, अशी माहिती आपचे गोवा संयोजक अमित पालेकर म्हणाले.

काँग्रेस आणि आपच्या लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर अमित पाटकर आणि अमित पालेकर यांनी याबाबत माहिती देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पाटकर आणि पालेकर यांनी रिव्हॉल्युशनरी गोवन (आरजी) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर देखील भाष्य केले. आरजी राज्यात मते फोडण्यासाठी लढणार असून, मतदार सुजाण आहेत, असेही पालेकर यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

Goa Todays Live Update: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

SCROLL FOR NEXT