भाडे द्यायला पैसे नाहीत म्हणाले नंतर लोकसभा लढण्याची घोषणा केली; परबांनी तासांत भूमिका बदलली - अमित पालेकर

दुसरीकडे काँग्रेसच्या अमित पाटकर यांनी आरजीसोबत चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केले आहे.
Goa Loksabha Election 2024| Manoj Parab | Amit Patkar | Amit Palekar
Goa Loksabha Election 2024| Manoj Parab | Amit Patkar | Amit PalekarDainik Gomantak

Goa Loksabha Election 2024

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी एकेकाळी पक्षाकडे कार्यालयाचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. मी त्यांना इंडिया आघाडीसोबत जागा वाटपासंबधित चर्चेसाठी संपर्क साधला सुरुवातीला त्यांनी होकार दिला मात्र, नंतर तासांभरात भूमिका बदलली असे, आपचे गोवा संयोजक अमित पालेकर म्हणाले.

तर, दुसरीकडे काँग्रेसच्या अमित पाटकर यांनी आरजीसोबत चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केले आहे.

काँग्रेस आणि आपच्या लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर अमित पाटकर आणि अमित पालेकर यांनी याबाबत माहिती देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती यावेळी पालेकर यांनी दिली. त्यामुळे आपने दक्षिणेत जाहीर केलेला उमेदवार आता माघार घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यावेळी पाटकर आणि पालेकर यांनी रिव्हॉल्युशनरी गोवन (आरजी) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर देखील भाष्य केले. आरजी राज्यात मते फोडण्यासाठी लढणार असून, मतदार सुजाण आहेत, असेही पालेकर यावेळी म्हणाले.

Goa Loksabha Election 2024| Manoj Parab | Amit Patkar | Amit Palekar
पर्यटन बोट राईड्स जेटीवर लहान मुलांसह पर्यटकांसाठी धोकादायक स्थिती, पाटकरांनी व्हिडिओतून उघड केले सत्य

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्ष त्यांच्याकडे कार्यालयाचे भाडे देण्यासाठी पैसे नाहीत अशे म्हणत होते पण, एक ते दोन तासांत त्यांनी लोकसभा लढण्याची घोषणा केली. आता लोकांना हे समजून घ्यायचे आहे, असे पालेकर म्हणाले.

तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रिव्होल्युशनरी गोवनसाठी अद्याप दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केले.

अमित पाटकर यांनी आरजीला इंडिया आघाडीसोबत येण्याचे आणि एकत्र लढण्याचे आवाहन केले. तसेच, भाजपच्या विरोधात प्रचार करुन मते मागितलेल्या सर्व आमदारांनी देखील इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समर्थन द्यावे असेही आवाहन पाटकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com