Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Shigmotsav In Dicholi: रंग, मुखवटे आणि पिचकाऱ्या! शिमग्याच्या साहित्याने फुलला बाजार

Bicholim Shigmotsav: डिचोलीत सर्वत्र शिमग्याचे वातावरण फुलू लागले असून, शिमग्यानिमित्त गुलाल, पिचकाऱ्या, मुखवटे आदी साहित्याने डिचोली बाजारही फुलला आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शिमगा म्हणजे रंगांची उधळण करण्याचा आणि वेगवेगळी ‘सवंगे’ रंगविण्याचा असा उत्साहाचा उत्सव. सध्या डिचोलीत सर्वत्र शिमग्याचे वातावरण फुलू लागले असून, शिमग्यानिमित्त गुलाल, पिचकाऱ्या, मुखवटे आदी साहित्याने डिचोली बाजारही फुलला आहे. या साहित्याची खरेदीही सुरू झाली असून, पुढील दोन दिवसांत या साहित्याच्या खरेदीला जोर येणार आहे. तशी शक्यताही दुकानदार व्यक्त करीत आहेत.

शिमगा म्हणजे रंगांची उधळण करण्याचा उत्सव. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे रंग (गुलाल) विक्रीस उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांना मागणी असल्याने यंदाही विक्रेत्यांनी नैसर्गिक रंग उपलब्ध केले आहेत.

डिचोलीतील बहुतेक सर्व भागात रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करण्यात येत असल्याने रंगांना मागणी असते. त्यामुळे बाजारात लाल, पिवळा, निळा आदी विविध प्रकारचे रंग उपलब्ध झाले आहेत. गुरुवारी (ता. १३) रात्री गावोगावी होळी पेटल्यानंतर सर्वत्र शिमग्याचा माहोल तयार होणार आहे.

विविध प्रकारचे साहित्यही बाजारात उपलब्ध असून, त्यांची खरेदीही सुरु आहे. उद्यापासून साहित्य खरेदीला जोर येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काळ बदलत असला, तरी अजूनही खास करुन ग्रामीण भागात मुखवटे, गुलाल आदी साहित्याला मागणी आहे, असे शहरातील एक घाऊक विक्रेते विद्याधर शिरोडकर यांनी सांगितले.

साहित्याचे दर वाढले!

शिमग्यानिमित्त बाजारात विविध आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. १०० रुपये ते ८५० रुपयेपर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध असून, या पिचकाऱ्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध प्राण्यांच्या चेहऱ्यांशी मिळतेजुळते आणि अक्राळविक्राळ मुखवटेही बाजारात उपलब्ध झाले असून, हे मुखवटेही लक्ष वेधून घेत आहेत. ८०० रुपये किमतीपर्यंतचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले आहेत. एकूण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिमगोत्सवाच्‍या साहित्याचे दर वाढलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT