Shigmo Festival Goa Dainik Gomantak
गोवा

19 मार्चपासून गोव्यात पाच प्रमुख शहरांमध्ये शिगमोत्सव मिरवणूक रंगणार

मिरवणुकीची सुरुवात फोंडयातून होणार असून पुढे मडगाव, वास्को, पणजी आणि म्हापसा येथे ही मिरवणूक होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Shigmo Festival Goa: राज्यात शिगमोत्सव मिरवणूका आयोजित करण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज शहरात बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यटन खात्याचे सचिव जे. अशोक कुमार आयएएस, उपस्थित होते. राज्यातील पाच प्रमुख शहरांमध्ये शिगमोत्सव मिरवणूक (Shigmo Festival Goa) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात 19 मार्चला फोंडा इथून होणार असून पुढे 20 मार्चला मडगाव, 22 मार्चला वास्को, तर पणजी येथे 26 मार्च आणि 27 मार्चला म्हापसा येथे ही मिरवणूक होणार आहे.

शिगमोत्सव मिरवणूक संध्या 4 वाजता सुरू होईल आणि कोविड शिष्टाचाराचे कडक पालन करूनच रात्री 10 वाजता समारोप होईल. या बैठकीत संबंधित केंद्रांसाठी शिगमो समित्यांची रचना, परेडचा मार्ग, शिगमो परेडसाठी पारितोषिके आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

गेल्यावर्षी कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली होती. परंतु यावर्षी सध्याची परिस्थिती पाहता, राज्यातील रुग्णसंख्या कमी होत चालल्याने यावर्षी शिगमोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला पर्यटन खात्याचे संचालक श्री. मेनिनो डिसोझा आयएएस, संबंधित नगरपालिकांचे मुख्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी -1 दक्षिण गोवा, सुरेंद्र नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी 2, उत्तर गोवा गोपाळ पार्सेकर, माहिती व प्रसिद्धी संचालक, दिपक बांदेकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT