चोर्ला घाटात तेलंगणातील गाडीचा अपघात; अपघाताचे कारण अस्पष्ट

या गाडीत तेलंगणातील (Telangana) एकूण 6 प्रवाशी होते. त्यातील 2 जण जखमी असल्याचे समोर आले आहे.
Accident News
Accident NewsDainik Gomantak

Accident News: अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गोव्यात येणार्‍या एका गाडीला चोर्ला घाटात अपघात झाला आहे. या गाडीत तेलंगणातील (Telangana) एकूण 6 प्रवाशी होते. त्यातील 2 जण जखमी असल्याचे समोर आले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील माहिती येणे अजून बाकी आहे.

दरम्यान, आज गोव्यातही तेलंगणाच्याच एका गाडीचा अपघात घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने तेलंगणातून गोव्यात आलेली एक कार रस्त्याशेजारील झाडीत घुसली. सुदैवाने या अपघातात हैद्राबाद येथील तीन युवक सुखरूप बचावले आहेत. त्यातच ज्याठिकाणी हा अपघात (Accident) घडला तिथे विजेचा खांब होता. विजेच्या खांबाला धडक बसली असती, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com