Shenaz Treasurywala Dainik Gomantak
गोवा

Shenaz Treasurywala: रस्त्यावर घालवले 18 दिवस! भारत पाकिस्तान तणावाच्या काळात अभिनेत्री अडकली गोव्यात, पडली आजारी

Shenaz Treasurywala In Goa: सध्या हा संघर्ष सुरु आहे. मी शांतीचा विषय काढला यामुळे मला थोडेसा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.

Pramod Yadav

पणजी: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात नागरी विमान उड्डाणांवर बंधने घालण्यात आली होती. अनेक विमानतळ देखील बंद करण्यात आली. याकाळात अनेकांना हवाई प्रवासात अडथळ्यांचा सामना करावा लागला. बॉलीवूड अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला हिला देखील याचा फटका बसला. तब्बल दहा दिवस शहनाजला गोव्यात थांबावे लागले या काळात ती आजारी देखील पडली.

चंदीगड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या शहनाजचे विमान अपात्कालिन परिस्थितीत गोव्यात लॅन्ड करण्यात आले. याकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक वाढला होता. शहनाजने Instagram story वरुन ती गोव्यात १८ दिवस राहिल्याची माहिती दिली आहे. या काळात गोव्यात खूप मौज मजा केल्याची तिने सांगितले पण आजाराने तिल्या ग्रासल्याची माहिती शहनाजने दिली.

शहनाजने Instagram story मध्ये दिलेल्या माहितीनुसार, "मला गोव्यात १८ दिवस रहावे लागले. पण, या काळात मला गोव्यात आनंद घेता आला नाही. तब्येत बिघडली, Acidity, व्हायरल ताप आणि पाठदुखी झाल्याची माहिती शहनाजने दिली. विमान वळविल्यानंतर मानसिक तयारी केली होती पण आजाराने गाठले याचा जास्त त्रास होतोय", असेही तिने म्हटलंय.

"माझी सध्या Hormone Replacement Therapy सुरु आहे, त्यामुळेच हा त्रास होतोय का? आणखी कशामुळे? काही कळत नाहीये, काय होतंय कोणत्या डॉक्टरला दाखवावे. त्यात हा संघर्ष सुरु आहे. मी शांतीचा विषय काढला यामुळे मला थोडेसा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला", असे शहनाजने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शहनाज बॉलीवूड अभिनेत्री आहे तिने शाहिद कपूरच्या इश्क विश्क या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बऱ्याच वर्षापासून ती सिनेमापासून लांब आहे. पण, ती ट्रॅव्हल व्लॉग आणि इन्फ्युएन्सर म्हणून काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT