Colvale Jail Employee Stress Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Shashank Narvekar Mental Healt: देशभरात पुरुष कर्मचाऱ्यांमधील आत्महत्या व मानसिक तणावाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: देशभरात पुरुष कर्मचाऱ्यांमधील आत्महत्या व मानसिक तणावाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ, वाढीव तास काम करण्याचा दबाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक कर्मचारी टोकाचे पाऊल उचलतात.

स्वेच्छानिवृत्तीसारखे पर्याय कर्मचाऱ्यांना परिस्थिती असह्य झाल्यानंतरच वापरावे लागतात, असे मत उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर यांनी व्यक्त केले. कोलवाळ कारागृहात नवनवे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. कारागृहातून चालणारे ड्रग्ज नेटवर्क, कैद्यांमधील मारामारी आणि हत्येपर्यंत पोहोचलेले वाद यामुळे हे कारागृह सुधारगृह राहिले नसून, गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे.

पोलीस आणि गुंड यांच्यातील कथित अभद्र युतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरत आहे. केवळ घटना घडल्यानंतर चौकशी समिती स्थापन करणे ही आता एक ‘औपचारिकता’ बनली आहे. अशा समित्यांचे अहवाल बहुतांश वेळा कागदावरच राहतात किंवा सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार गुंडाळले जातात.

त्यामुळे केवळ तात्पुरत्या चौकशीऐवजी प्रत्येक शासकीय संस्था आणि कारागृहात स्वतंत्र ‘मानसिक आरोग्य व मार्गदर्शन कक्ष’ तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळविरोधी समिती स्थापन करण्याची गरज आहे. जिथे कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता आणि आपले नाव गुप्त ठेवून तक्रारी मांडू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT