Shapur Bandora Ponda illegal huts Dainik Gomantak
गोवा

Bandora: बांदोड्यात 31 झोपड्यांवर पडणार हातोडा! जेसीबी आल्यामुळे तणावाचे वातावरण; हस्तक्षेपामुळे 15 दिवसांनंतर कारवाई

Shapur Bandora Slum Encroachment: फोंड्याला अगदी जवळ असलेल्या शापूर-बांदोडा भागात गेली अनेक वर्षे झोपड्या उभारून काही मजूर लोक राहतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Shapur Bandora Slum Encroachment

मडकई: शापूर-बांदोडा, फोंडा येथील अनधिकृतपणे उभारलेल्या ३१ झोपड्या पाडण्यासाठी मंगळवारी (ता.४) सकाळी कारवाई सुरू झाल्यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे प्रकरण गेली अनेक वर्षे न्यायप्रविष्ट होते. मात्र, न्यायालयाने या झोपड्या पाडण्याचा आदेश दिल्यानंतर संबंधित जागेचा मालक, वकील जेसीबी यंत्रासह आल्यानंतर या ठिकाणी गोंधळ उडाला.

शेवटी ही कारवाई पंधरा दिवसांपर्यंत स्थगित ठेवण्याच्या विनंतीला संबंधित जमीनमालकाने होकार दिल्यामुळे तणाव निवळला; पण पंधरा दिवसांनंतर या झोपड्या पाडण्यात येणार आहेत.

फोंड्याला अगदी जवळ असलेल्या शापूर-बांदोडा भागात गेली अनेक वर्षे झोपड्या उभारून काही मजूर लोक राहतात. मात्र, ही जमीन काझी नामक इसमाची असून गेली अनेक वर्षे या झोपड्या हटवण्यासाठी काझीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेला अनुसरून न्यायालयाने या झोपड्या पाडण्यासाठी अनुमती दर्शवल्याने त्या पाडण्यासाठी कारवाई करण्यास आलेल्या संबंधित जमीन मालकाला या झोपडपट्टीवाल्यांना इतरत्र स्थलांतर होण्यासाठी पंधरा दिवस देण्याची विनंती केली. स्‍थानिक सरपंच रामचंद्र नाईक, माजी सरपंच राजेश नाईक व इतरांनी विनंती केली. त्याला अनुसरून ही मागणी मान्य केली आहे.

स्थलांतर करण्यास वेळ देणे गरजेचे!

सरपंच रामचंद्र नाईक यांनी सांगितले की, या ठिकाणी राहणाऱ्या मुसलमान बांधवांचा ईद सण जवळ आला आहे, त्यामुळे या लोकांना इतरत्र स्थलांतर होण्यासाठी वेळ देणे आवश्‍यक होते, म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून संबंधितांकडे मागणी केली.

माजी सरपंच राजेश नाईक यांनी सांगितले की, गेली चाळीस ते पन्नास वर्षे हे लोक इथे राहतात. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या लोकांचे इतरत्र स्थलांतर होण्यासाठी थोडा अवधी देणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT