Bandora Panchayat News: बांदोडा पंचायत क्षेत्रातील समृद्ध अशी जैवसंपदा राज्य सरकारच्या जैव संपादन नोंदवहीत नोंद करण्यात आली असून ही बांदोडावासीयांसाठी खुशीची बात असल्याचे बांदोडा जैवविविधता समितीतर्फे बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Bandora Biodiversity CommitteeDainik Gomantak

Bandora News: बांदोडावासीयांसाठी खुशखबर! पंचायत क्षेत्रातील जैवसंपदेची सरकार दरबारी नोंद

Bandora Panchayat News: बांदोडा पंचायत क्षेत्रातील समृद्ध अशी जैवसंपदा राज्य सरकारच्या जैव संपादन नोंदवहीत नोंद करण्यात आली असून ही बांदोडावासीयांसाठी खुशीची बात असल्याचे बांदोडा जैवविविधता समितीतर्फे बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Published on

Bandora Biodiversity Committee

फोंडा: बांदोडा पंचायत क्षेत्रातील समृद्ध अशी जैवसंपदा राज्य सरकारच्या जैव संपादन नोंदवहीत नोंद करण्यात आली असून ही बांदोडावासीयांसाठी खुशीची बात असल्याचे बांदोडा जैवविविधता समितीतर्फे बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी या समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे तसेच निर्मल विश्‍वचे प्रदीप कामत आणि समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेल तिळवे म्हणाले, की बांदोड्यातील जैवसंपदेची समग्र माहिती राज्य सरकारच्या जैव संपादन नोंदवहीत नोंद झाल्याने या गावाला ती उपयुक्त ठरणार असून लोकांनी लोकांच्या माहितीसाठी तयार केलेला हा दस्तावेज आहे. बांदोड्यातील नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथील पक्षी, फुले, फळे, उपलब्ध नैसर्गिक साधने आणि इतर अनेक प्रकारची माहिती जी लोकांना माहिती नाही ती या दस्तावेजात उपलब्ध करण्यात आली आहे.

Bandora Panchayat News: बांदोडा पंचायत क्षेत्रातील समृद्ध अशी जैवसंपदा राज्य सरकारच्या जैव संपादन नोंदवहीत नोंद करण्यात आली असून ही बांदोडावासीयांसाठी खुशीची बात असल्याचे बांदोडा जैवविविधता समितीतर्फे बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Bandora News: अभिमान! गोव्यातील 'या' गावाने पटकवला केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार

बांदोडा जैवविविधता समितीला माहिती गोळा करताना पश्‍चिम घाटात दुर्गम भागात सापडणारा मलबार ग्लायडिंग फ्रॉग अर्थातच एक विशिष्ट प्रकारचा बेडूक सापडला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बेडकाने केलेला स्वतःचा निवास आणि प्रजनन यांची सखोल माहितीही या दस्तावेजात नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com