Shanti Nagar Houses Dainik Gomantak
गोवा

Vasco News : शांतीनगरातील घरांना तडा जाणार नाही; रेल्वे अधिकाऱ्यांची ग्वाही

Vasco News : आमदार कृष्णा साळकर यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, शांतीनगर येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाच्या परिसरातील लोकवस्ती असलेल्या जागेची वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पाहणी करून रेल्वे अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना केल्या.

रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असून येथील घरांना तडा जाणार नाही, याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्याचे साळकर यांनी सांगितले.

दाबोळी ते वास्को रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे दुपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून वास्को मतदार संघातील शांतीनगर येथे रेलमार्गाकडे शेकडो घरांचा प्रश्न उपस्थित झाला होता. रेल मार्गावरील भागात दुतर्फा शेकडो घरे असून डोंगराळ भागातून हा रेलमार्ग वास्को रेल्वे स्थानकाकडे जात आहे.

दरम्यान रेल्वे दुपदरीकरण कामामुळे येथील घरांवर गंडांतर आले होते. मात्र याविषयी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन यावर विचारविनिमय करून या घरांना दिलासा दिला. त्यानुसार आमदार साळकर या कामाचा वारंवार आढावा घेत आहेत.

दरम्यान, आज आमदार साळकर यांनी शांतीनगर येथे रेल्वे दुपदरीकरण कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेविका श्रध्दा महाले, नगराध्यक्ष गिरीष बोरकर, रेल्वे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

रेल्वे अधिकाऱ्यांना आमदार साळकर यांनी योग्य त्या सूचना केल्या व कामाच्या वेळी घरांना तडा जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी, असे सुचविले.

याठिकाणी शेकडो घरे असून यापैकी फक्त तीन घरे पाडण्यात आली व त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,असे आमदार कृष्णा साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT