Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

Dabolim Airport Closure News: दाबोळी विमानतळ बंद होण्याच्या शक्यतेवरुन गोव्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे.
Dabolim Airport Closure News
south goa mp viriato fernandes Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दाबोळी विमानतळ बंद होण्याच्या शक्यतेवरुन गोव्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे. दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला असून दाबोळी विमानतळावरील नागरी उड्डाणे बंद करण्याचे आदेश येत्या काही दिवसांत येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या विश्वासार्ह स्रोतांकडून ही माहिती मिळाल्याचे सांगतानाच, त्यांनी त्या स्रोतांची नावे उघड करण्यास मात्र नकार दिला आहे. या महत्त्वाच्या विषयावर विरियातो यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून गोव्याच्या विमान वाहतुकीच्या भविष्याबाबत स्पष्ट 'रोडमॅप' जाहीर करण्याची मागणी केली.

Dabolim Airport Closure News
Dabolim Airport: "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावून सांगत विरोधकांची केली बोलती बंद

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी यामागील आर्थिक गणितांवर बोट ठेवताना गंभीर आरोप केले आहेत. मोपा विमानतळ चालवणाऱ्या कंपनीला तब्बल 276 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि मोपा विमानतळाचा व्यवसाय वाढवण्यासाठी संबंधित कंपनी दाबोळीवरील नागरी व्यवहार बंद करण्यासाठी सरकारवर दबाव आणू शकते, असा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारकडूनही या खाजगी कंपनीला मदत मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विरियातो यांच्या मते, या कंपनीने देशातील इतर राज्यांतील विमानतळांचे व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर तेथील काही विमानतळे बंद झाल्याचा इतिहास आहे, त्यामुळे गोव्याच्या बाबतीतही हाच धोका संभवतो.

Dabolim Airport Closure News
Dabolim Airport: ‘दाबोळी’वर दिल्लीत पुन्हा खल! मंत्री राजनाथ सिंग यांची तानावडे-गुदिन्होनी घेतली भेट Watch Video

दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) वाचवण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरु केल्याचेही विरियातो यांनी नमूद केले. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दाबोळी विमानतळ नागरी सेवेसाठी तातडीने बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या आणि त्यासंदर्भात एक फाईलही पुढे सरकली होती, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आपण थेट केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना लेखी पत्र दिले.

Dabolim Airport Closure News
Dabolim Airport: दाबोळीवर विमाने, पर्यटक घटले! विधानसभेत CM सावंतांच्या उत्तरातून आकडेवारी समोर

दाबोळी विमानतळ बंद करण्याची ती फाईल थांबवण्यात यावी आणि हे विमानतळ लोकांसाठी सुरुच ठेवावे, अशी आग्रही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्यातील (Goa) पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांवर त्याचे विपरित परिणाम होतील, अशी भीती सध्या व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com