CM Pramod Sawant, Eknath Shinde, Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात रंगणार शंखनाद महोत्सव! CM सावंतांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

Shankhanad Mahotsav: मिरवणूक रामनाथी, कवळे, तिस्क तसेच वरचा बाजार, फोंडा बसस्थानक, त्यानंतर फर्मागुढी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापर्यंत नेण्यात आली

Sameer Panditrao

फोंडा: सनातन संस्थेतर्फे फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील मैदानावर शनिवार, १७ तारखेपासून तीन दिवसीय सनातन शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उदघाटन शनिवार, १७ रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच तपोभूमीचे पीठाधीश पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, स्वामी गोविंद देव गिरी महाराज आदी महनीय व्यक्तींची उपस्थिती असेल.

सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत श्रीराम राज्य संकल्प जपयज्ञ होईल. नंतर उदघाटन समारंभ होईल. या महोत्सवाविषयी जागृती व्हावी, यासाठी आज (शुक्रवारी) संध्याकाळी फोंडा शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत हिंदुत्वाचा जयघोष करण्यात आला. रामनाथी येथील सनातन आश्रमाजवळून या वाहनांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

सुरुवातीला भारत सरकारचे माजी वरिष्ठ अधिकारी अरुण देसाई यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. मिरवणुकीच्या वेळेला सुवासिनींनी उपस्थितांचे औक्षण केले. यानिमित्त जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

ही मिरवणूक रामनाथी, कवळे, तिस्क तसेच वरचा बाजार, फोंडा बसस्थानक, त्यानंतर फर्मागुढी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाहनांसह सहभागी झाले होते. गोवा तसेच लगतच्या राज्यांमधील वाहनचालकांनी मिरवणुकीत भाग घेऊन मिरवणूक यशस्वी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT