Navratri Utsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Navratri Utsav : शंभो महादेव संस्थानात विविध कार्यक्रम

तसेच दररोज घुमट आरत्या, तीर्थप्रसाद व नंतर दांडिया असे विविधांगी कार्यक्रम होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri Utsav : पणजी माटववाडा-बिठ्ठोण येथील श्री शंभो महादेव संस्थानतर्फे श्रीदुर्गा देवीचा नवरात्रोत्सव व मखरोत्सवासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दररोज रात्री ८ वा. मखरोत्सव होणार आहे.

तसेच दररोज घुमट आरत्या, तीर्थप्रसाद व नंतर दांडिया असे विविधांगी कार्यक्रम होणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. अभिषेक, घटस्थापना, दुर्गापूजन आदी विधी पार पडल्या.

१६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. रात्री ८ वा. मखरोत्सव, घुमट आरत्या, तीर्थप्रसाद, नंतर महाप्रसाद होईल.

१७ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. महारुद्र हनुमान आरती मंडळ, पर्वरीतर्फे घुमट आरत्या होतील. १८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तीर्थप्रसाद व दांडिया होईल.

१९ रोजी अनंत शिवसाई घुमट आरती मंडळातर्फे घुमट आरत्या सादर होतील. २० रोजी मखरोत्सवानंतर बाळगोपाळांतर्फे घुमट आरत्या होतील.

२१ रोजी मखरोत्सवानंतर सातेरी आरती मंडळ, म्हापसा यांच्यातर्फे घुमट आरत्या सादर होतील. २२ रोजी संध्या. ६ वा. नागेश महारुद्र भजनी पथक कुडका यांच्यातर्फे भजन सादर होणार आहे.

२३ रोजी संध्या. ७ वा. बालिका पूजन होईल. २४ रोजी घट विसर्जन व दसरा साजरा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT