Raghuveer Shirodkar with Shubham Narvekar speaking at the press conference Dainik Gomantak
गोवा

Mhadei : शहा यांचे म्हादईसंदर्भातील वक्तव्य फक्त ‘राजकीय विधान’ ; शुभम नार्वेकर

भाजयुमो : कर्नाटकला पाणी वळवू देणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : म्हादई प्रश्नावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन तोडगा काढला, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील सभेत केले होते. त्यावर गोव्यातील एकही ज्येष्ठ भाजप नेता अजून बोलला नसला तरी हे वक्तव्य फक्त राजकीय स्वरूपाचे होते, अशी प्रतिक्रिया आज भाजयुमोचे दक्षिण गोवा अध्यक्ष शुभम नार्वेकर यांनी व्यक्त केली.

म्हादई प्रश्नावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेट करतात. त्याला उत्तर देण्यासाठी आज मडगावात भाजयुमोची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजयुमोचे राज्य कार्यकारिणी सचिव रघुवीर शिरोडकर आणि दक्षिण गोवा कार्यकारिणी उपाध्यक्ष आशिष फळदेसाई उपस्थित होते.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणाबद्दल विचारले असता, प्रमोद सावंत यांचे हे सरकार सामान्य लोकांचे हित राखणारे आहे. त्यामुळे या इस्पितळाचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोवा फॉरवर्ड हा पक्ष राजकीय अस्तित्व गमावून बसला असून या पक्षाला जनाधार नसल्याने त्यांच्या आमदारांची संख्या तीनवरून एकावर आली. राजकीय अस्तित्वासाठीच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. ही टीका सुरूच राहिल्यास भाजयुमोचे कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांना राज्यात फिरणेही मुश्किल करतील.

- शुभम नार्वेकर, अध्यक्ष, भाजयुमो, द. गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT