Kalsa-Bhandura Project म्हादईच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टला (डीपीआर) केंद्र सरकराने परवानगी दिली. ती परवानगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वासात घेऊनच दिली गेल्याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकमधील प्रचारसभेत केला होता.
या विधानाचे मुख्यमंत्री सावंत यांनी खंडन केलेले नाही, त्यामुळे आता शहा यांनीच फोंड्यातील सभेत त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समील वळवईकर यांनी केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रवक्ते जयेश शेटगावकर, आयटी सेलचे तनोज अडवलपालकर यांची उपस्थिती होती.
वळवईकर म्हणाले, कर्नाटकात जानेवारी महिन्यात झालेल्या जाहीर सभेत कळसा-भांडूराच्या डीपीआरविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा केला होता.
त्यात त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वासात घेऊन डीपीआरला परवानगी दिली गेल्याचा उल्लेख केला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी त्यावर सावध भूमिका मांडली, त्यांनी केंद्र सरकारने राज्य सरकारची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
तसेच गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे खंडनही केले नाही. आता भाजपचे अनेक मंत्री कर्नाटकात प्रचाराला जाणार आहेत.
या मंत्र्यांना गोंयकार असल्याचा अभिमान नाही. जे राज्य आपल्यावर अन्याय करीत आहे, त्याच राज्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हे नेते जाणार आहेत.
गृहमंत्री शहा यांच्या सभेवेळी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व इतर सर्व नेतेमंडळी व्यासपीठावर असणार आहेत.
त्यामुळे यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी कर्नाटकाला दिलेल्या डीपीआर मंजुरीविषयी स्पष्टीकरण मागावे. जनतेसमोर सद्यस्थिती काय ती सांगावी, असे त्यांनी आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.