Goa Fire Brigade: अग्निशमन दलाने वाचवली 169 कोटींची संपत्ती- सावंत

आयएसओ मानांकन ही अभिमानाची बाब
Goa Fire Brigade
Goa Fire Brigade
Published on
Updated on

Goa Fire Brigade राज्यात यावर्षी विविध ठिकाणी लागलेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये सुमारे 81 कोटी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली असली, तरी 169.53 कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे, असे गौरवोदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

पणजीत अग्निशमन सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माझगाव डॉकमध्ये 1944 मध्ये लागलेल्या आगीत शेकडो अग्निशमन दलाचे अधिकारी शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभर 14 एप्रिल हा ‘अग्निशमन सेवा दिवस’ म्हणून पाळला जातो.

यानिमित्ताने या क्षेत्रात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यात येते. आज सकाळी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शहिदांना आदरांजली वाहून अग्निशमन दलाने दिलेली मानवंदना स्वीकारली.

Goa Fire Brigade
Goa Police: तीन महिन्यांत दक्षिण गोव्यातील 8,911 भाडेकरूंची पडताळणी

राज्यातील इतर खात्यांनीही अग्निशमन दलाचा आदर्श घेऊन आपला व्यवहार अधिक जनताभिमुख केला पाहिजे. राज्यात गेल्या काही दिवसांत दोन गंभीर घडल्या. एक बर्जर पेंट कंपनीला लागलेली आग.

तिथे मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टाळण्यात यशस्वी झालो. तेथे 24 तास अधिकारी कार्यरत होते. दुसरी दुर्घटना म्हणजे, जंगलांना लागलेल्या आगीच्या घटना. पेडण्यापासून काणकोणपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणांनी जंगलात आगीच्या दुर्घटना घडल्या.

ही आग विझविण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम केले. यात अग्निशमन जवानांपासून  मंत्री, अधिकाऱ्यांपर्यंतचे घटक कार्यरत होते. यानिमित्ताने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. अजित कामत यांनी सूत्रसंचालन केले.

Goa Fire Brigade
G-20 Summit Goa 2023 शिखर बैठकीची जय्यत तयारी

189 जवानांची भरती

सावंत म्हणाले की, आम्ही नवीन 189 अग्निशमन जवानांची भरती केली. आपदा मित्र, आपदा सखी यांनाही प्रशिक्षण दिले आहे. त्यांना संपूर्ण राज्यात सेवा देता येईल. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

7 जणांना वाचवले

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचलनालयाला गेल्या वर्षात 7 हजारांहून अधिक कॉल्स आले होते. त्यातील केवळ 9 कॉल बोगस होते. आगीच्या घटनांमध्ये 10 जणांनी जीव गमावला, तर 7 जणांचा जीव वाचवण्यात यश आले.

संचलनालयाला उत्कृष्ट सेवेबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे. शिवाय ऑक्युपेशनल हेल्थ सर्टिफिकेशनही मिळाले, ही अभिमानाची बाब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com