Sonsodo Catches Fire Again Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो आगीची गुन्हा अन्वेषण चौकशी व्हावी; शॅडो कौन्सिलची मागणी

चौकशी अहवाल जाहीर करण्याचीही साव्हियो कुतिन्हो यांची मागणी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : सोनसोडोवर शुक्रवारी लागलेली आग ही मानवनिर्मित असल्याचा थेट आरोप करताना शेडो कौन्सिलने या आगीची गुन्हा अन्वेषणाकडून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. हा चौकशी अहवाल जाहीर केला जावा. त्यामुळे लोकांना सत्य कळून येईल, असे साव्हियो कुतिन्हो यांनी म्हटले आहे. (shadow council demands enquiry of Sonsodo Fire News Updates)

संघटनेचे निमंत्रक असलेल्या कुतिन्हो यांनी मिथेन वायुमुळे किंवा मनोविकासमधील वेल्डिंगमुळे ठिणगी पडून ही आग भडकली यावर कोणाचाच विश्वास नाही. सोनसोडोवरील काही मोठे कचरा व्यवस्थापन प्रस्ताव हातावेगळे करण्यासाठीही हा प्रकार घडवून आणण्याची शक्यता असून चौकशीतून ते उघड होईल, असं म्हटलं आहे.

सरकार खरेच सोनसोडोबाबत प्रामाणिक असेल तर त्याने सरकारी कार्यालयांऐवजी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तर आगीच्या घटना टळतील आणि परिसरांतील रहिवाशांच्या समस्या टळतील, असे सुचवून कुतिन्हो यांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने त्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. पालिकेने त्या जवानांना पिण्यासाठी पाणीही पुरविण्याची तसदीही न घेतल्याने ते काम शेडो कौन्सिलने केल्याचंही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT