CM Pramod Sawant At Goa Monsoon Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: आग रामेश्‍‍वरी बंब सोमेश्‍‍वरी

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: विधानसभेत मंगळवारी थोडे हलके फुलके वातावरण पाहायला मिळाले

गोमन्तक डिजिटल टीम

किनाऱ्यांवर आग लागली तर समुद्राचे पाणी आग विझवण्यासाठी वापरता आले पाहिजे. तशी यंत्रणा निर्माण करण्याचा विचार सरकारने करावा हा सल्ला आहे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचा. किनाऱ्यांवर शॅक्‍सना आग लागली तर तेथे जाऊ शकणारा अग्निशमन दलाचा बंब राज्यात नसल्याचा विषय प्रश्‍‍नोत्तराच्या तासाला त्यांनी उपस्थित केला व हा सल्ला दिला. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही त्याची दखल घेत ‘हो, एक पंप लावून या पाण्याचा उपयोग करता येतो का हे पाहायला हवे’ अशी प्रतिक्रिया द्यावी लागली.

विधानसभेत मंगळवारी थोडे हलके फुलके वातावरण पाहायला मिळाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘आता अन्‍य काही ठिकाणी वाऱ्या करतील’ अशी टिपणी केल्यावर ‘विजयलाही नेतो’ असे मुख्यमंत्री मिश्कीलीने म्हणाले.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मात्र खाजन शेती वाचवण्याचा मुद्दा गांभीर्याने मांडला. खारफुटीमुळेच बांध कसे सुरक्षित राहतात याची मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना ‘केवळ देव खाली आला तरच खाजन शेती वाचवणे शक्य होईल’ असा शेरा मारायलाही ते विसरले नाहीत.

या विषयावरील चर्चेवेळी कंत्राटी शेतीचा विषय आला. त्यावेळी सरकार याचा विचार करणार का, अशी थेट विचारणा विजय सरदेसाई यांनी केली. ‘विजय आमच्या बाजूने येणार असतील तर त्याचाही विचार करू’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. डोंगर कापले गेल्याने होणाऱ्या अपघातांची चर्चा करताना बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी कधी तरी उत्तरेतही दौरा करावा असा सल्ला त्यांना देण्यात यावा.

विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री अलीकडे सासष्टीत बरेच फिरतात, त्यांनी लोकांशीही संवाद साधावा असे सुचविले. तसेच त्‍यांनी नव्या बोरी पुलाचा संबंध कोळसा वाहतुकीशी जोडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘सारे काही सासष्टीशी नेऊन का जोडता?’ असे विचारल्यावर सरदेसाई यांनी तत्काळ ‘सासष्टीकरच मला निवडून देतात’ असे प्रत्युत्तर दिले. नव्या बोरी पुलामुळे जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या मागणीतील हवाच काढली. आमदार व्‍हेंझी व्हिएगस नेहमी अभ्यासू प्रश्‍‍न विचारतात.

नव्या बोरी पुलाच्‍या गरजेबाबत २०१६ मध्ये अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळी झुआरी पूल नव्हता. आता झुआरी पुल खुला करण्यात आल्याने नव्या बोरी पुलाची गरज आहे का याबाबत नव्याने अभ्यास केला जाणार का, अशी विचारणा व्हिएगस यांनी केली. मात्र सरकारने नव्या बोरी पुलाचा संबंध मुरगाव बंदरातील क्रुझ टर्मिनलशी जोडत गावांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचा विषय मांडून व्हिएगस यांच्या मुद्यापासून लक्ष दुसरीकडे वळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT